13 December, 2023

 

औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसमतनगर येथे तारतंत्री व्यवसायासाठी

तासिका तत्त्वावर निदेशक नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 13  :  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसमतनगर येथील तारतंत्री या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना शिकवण्यासाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात एक वर्षासाठी तासिका तत्त्वावरील निदेशकांची आवश्यकता असल्याने पात्रताधारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

यासाठी  जास्तीत जास्त उमेदवारांनी आपला अर्ज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बसमतनगर येथे दिनांक 30 डिसेंबर, 2023 रोजी 5:30 पर्यंत जमा करावे. या तारखेनंतर मुलाखतीची  तारीख निश्चित करुन उमेदवारांना कळविण्यात येईल व मुलाखत घेऊन योग्य व पात्रताधारक उमेदवाराची निवड करण्यात येईल. यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केलेले आहे.

******

No comments: