01 December, 2023

 

जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभातफेरी व शपथग्रहन कार्यक्रम उत्साहात साजरा

 




 

हिंगोली (जिमाका), दि. 01 :  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांच्यावतीने आज दि. 01 डिसेंबर, 2023 रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथुन भव्य प्रभातफेरी व शपथग्रहन कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 9.00 वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवुन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन जागतिक एड्स दिनाची उपस्थितांना शपथ दिली.

दि. 1 डिसेंबर, 2023 जागतिक एड्स दिनाचे ब्रिदवाक्य "Let Community Lead" ("समाजाचा पुढाकार एचआयव्ही/एड्सचा समूळ नाश") आहे. युवा वर्ग, अतिजोखीम गट आणि सामान्य नागरीक हे HIV प्रतिबंधासाठी बदल घडवू शकतात, त्यासाठी कलंक व भेदभाव कमी करण्यास आज आपण सर्वानी मिळून सहभाग नोंदवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी प्रभात फेरीच्या उ‌द्घाटन प्रसंगी केले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपक मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सतिष रुणवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाहय) डॉ. किरण कुराडे, डॉ. गोपाल कदम, डॉ. बालाजी भाकरे, डॉ. नारायण भालेराव, डॉ सुनिल पाटील, डॉ. मनिश बगडीया, डॉ. प्रकाश कोठुळे SMO ART, श्रीमती आशा क्षीरसागर मेट्रन, श्रीमती रागिणी जोशी, गणेश साळुंके, प्राचार्य कुलदिप कांबळे, कविता भालेराव, श्रीमती. खंडारे, श्रीमती. अलका रणविर, ईरफान बुरेणी तसेच रुग्णांलयाचे सर्व अधिकारी, परिचारिका, कर्मचारी यांचे सह TI NGO, Vihaan NGO यांचे कर्मचारी उपस्थित होते.

या प्रभातफेरीमध्ये शासकीय नर्सीग महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, हेडगेवार दंत महाविद्यालय, आदर्श महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय, विवेकानंद नर्सीग महाविद्यालय व इतर महाविद्यालयातील युवक युवतीनी सहभाग नोंदवला. जिल्हा रुग्णालयापासुन निघालेली प्रभातफेरी शिवाजी चौक-पोस्ट ऑफिस रोड-जवाहर रोड-इंदिरा गांधी चौक- महेश चौक-महात्मा गांधी चौक येथे पोहचली. यावेळी उपस्थित सर्व युवक युवतींना HIV/AIDS प्रतिबंधासाठी समाजाचा सहभाग या बाबत ज्ञानेश्वर चौधरी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी " समाजाचा पढाकार एचआयव्ही/एड्सचा समूळ नाश" "वचन पाळा एड्स टाळा" यासह इतर अनेक घोषणांनी सर्व वातावरण दुमदुमुन गेले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनीत उबाळे यांनी केले.

या प्रसंगी उपस्थित सर्व युवक व युवतींना प्रतिक फाऊंडेशन, हिंगोलीचे डॉ. किशन लखमावार यांच्या वतीने पाणी व बिस्कीट वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय पवार, आशिष पाटील, टिना कुंदनानी, श्रीमती साबळे, श्रीमती वाठोरे, श्रीमती बलखंडे, अब्दुल मुजीब, श्रीमती स्वाती चोपडे, श्रीमती सुनिता गायकवाड, नितीन राठोड, श्रीमती. विद्या गायकवाड, संदिप सोलूंके, बालाजी चापाकानडे, देवानंद रायबोले व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

******

No comments: