21 December, 2023

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा गतिमानता पंधरवाडानिमित्त

जनजागृती मेळाव्याचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 21 : मा.विकास आयुक्त (उद्योग) यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या नेतृत्तवाखाली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा गतिमानता पंधरवाडा दि. 18 डिसेंबर, 2023 ते दि. 02 जानेवारी, 2024 पर्यंत हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत सर्व तालुक्यामध्ये जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या पंधरवाड्यात जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरसेटी, एमसीईडी, मिटकॉन, कौशल्य विकास केंद्र, महिला बचत गट, औद्योगिक विकास समूह इत्यादी ठिकाणी जनजागृती मेळाव्याच्या माध्यमातून प्रसिध्दी करण्यात येत आहे. या जनजागृती मेळाव्यात पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जागेवरच भरुन घेण्यात येणार असून प्राप्त अर्जांची त्याच दिवशी छाननी करण्यात येऊन कर्ज प्रस्ताव त्याच दिवशी बँकेत पाठविण्याची कार्यवाही जिल्हा उद्योग केंद्रामार्फत करण्यात येत आहे. बँकेत पाठविण्यात आलेल्या कर्ज प्रकरणावर तातडीने निर्णय घेऊन डिसेंबर अखेर किमान 50 टक्के उद्दिष्ट साध्य करण्याबाबत सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील सर्व बँक शाखांना देण्यात आलेल्या आहेत.

जिल्ह्यातील 18 ते 45 वयोगटातील नवीन उद्योग करण्यास इच्छूक असणाऱ्या सर्व युवक, युवतींनी या पंधरवाड्याच्या निमित्ताने जास्तीत जास्त प्रकरणे www.Maha-cmegp.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अपलोड करावीत किंवा जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग मंडळ, एमसीईडी, नवीन प्रशासकीय इमारत, हॉल नं. एस-12, हिंगोली येथे संपर्क साधावा. ज्यांचे प्रस्ताव बँक शाखेकडे प्रलंबित आहेत त्यांनी बँक शाखेकडे संपर्क साधून आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.  

*******   

No comments: