24 November, 2016

जिल्हा परिषद निवडणूक - अंतिम प्रभाग रचनेकरीता आरक्षण जाहीर

हिंगोली, दि.24:- मा. राज्य निवडणुक आयुक्त,महाराष्ट्र यांच्याकडील अधिसुचना अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 (महाराष्ट्र अधिनियम ,5) च्या कलम 12 पोट कलम (1) खाली हिंगोली जिल्ह्याचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या  अनुसुचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे हिंगोली जिल्हा परिषद जितक्या निवडणूक विभागामध्ये (गट) विभागण्यात येईल, त्या निवडणूक विभागाची संख्या व त्याची व्याप्ती  निश्चित करणारा आणि ज्या निवडणूक विभागामध्ये अनुसुचित जाती , अनुसुचित जमाती व नागरीकांचा मागासप्रवर्ग  आणि त्याच प्रमाणे स्त्रियांकरीता जागा राखुन ठेवण्यात येतील. ते निवडणूक विभाग  आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी ( अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व नागरिकांचा मागसप्रवर्ग, आणि त्याच प्रमाणे इतर सर्वसाधारण स्त्रियांसह) जागा राखुन ठेवण्यात येतील, ते निवडणूक विभाग दर्शविणारा क्रमांक जिपपंसनि / सा.प्र./कावी दिनांक 10/10/2016 चा आदेशाचा  प्रारुप मसुदा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 (सन 1962 चा महाराष्ट्र अधिनियम,5) च्या कलम 12 पोट कलम (1)  निश्चीत केलेल्या पध्द़तीप्रमाणे उक्त़ जिल्हा परिषद क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी  प्रसिध्द करण्यात  आला होता. त्यास अनुसरून आलेल्या हरकतीचा सर्वकष विचार करून जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आदेश देण्यात आले आहेत.
                महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम ,1961 (सन 1962 च्या महाराष्ट्र अधिनियम ,5) चा कलम 9 (1) अन्वये राज्य निवडणुक आयुक्त महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसुचना क्रमांक रानिआ/जिपपंस-2016/ प्र.क.16/ का.7 दिनांक 18/08/2016 व पत्र क्र. रानिआ/जिपपंस-2016/प्र.क.16/का.7 दिनांक 18/08/2016 व क्र.रानिआ/ जिपपंस/2011/ प्र.क.14/ का-7 दिनांक - 04/10/2011  चे  आदेशान्वये त्यांनी हिंगोली जिल्हा परिषदेच्याबाबतीत  खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या  अधिनियम 1961 ( सन 1962 च्या महाराष्ट्र अधिनियम ,5) चा कलम 12 चा पोट कलम (2) अन्वये आणि राज्य निवडणुक आयुक्तांच्या क्रमांक अधिसुचना रानिआ/जिपपंस-2016/ प्र.क.16/ का.7 दिनांक 18 ऑगस्ट, 2016 क्र. रानिआ/ जिपपंस/2011/ प्र.क.14/ का-7 दिनांक - 04/10/2011  च्या पत्रान्वये त्यांनी हिंगोली जिल्हा परिषदेच्या बाबतीत खालील दर्शविल्याप्रमाणे अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती , नागरिकांचा मागासप्रवर्ग यांच्यासाठी राखुन ठेवावयाच्या  जागा व स्त्रियांसाठी (अनुसुचित जाती  , अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखुन ठेवावयाच्या जागा) राखुन ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

निवडावयाच्या सदस्यांची एकुण संख्या :-  52 जागा , अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्ग यासाठी राखुन ठेवावयाच्या जागांची संख्या :-  28 जागा , अ) अनुसुचित जाती   :-  08   जागा , ब) अनुसुचित जमाती :-   06   जागा , क) ना.मा.प्रवर्ग  :-14   जागा.
स्त्रियांसाठी ( अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखुन ठेवावयाच्या जागा धरुन ) राखुन ठेवावयाच्या एकुण जागा :- 26 जागा
उपरोक्त क्र.(3) पैकी वरील क्रमांक (2) मधील (अ),(ब), (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसाठी  राखुन ठेवावयाच्या जागांची संख्या खालील प्रमाणे राहील :-
अ) अनुसुचित जाती   :- 04 जागा ,  ब) अनुसुचित जमाती :-  03  जागा , क) ना.मा.प्रवर्ग :- 07  जागा
सर्वसाधारण स्त्रियांसाठी  राखुन ठेवावयाची जागांची संख्या :- 12  जागा .
राज्य निवडणुक आयुक्त महाराष्ट्र यांच्या कडील अधिसुचना क्रमांक  अधिसुचना रानिआ/जिपपंस-2016/ प्र.क.16/ का.7 दिनांक 18/08/2016 व पत्र क्र. रानिआ/जिपपंस-2016/प्र.क.16/का.7 दिनांक 18/08/2016  अन्वये  प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत  समित्या अधिनियम, 1961 ( सन 1962 च्या महाराष्ट्र अधिनियम,5 ) चा कलम 12 चा पोट कलम (1) खाली जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी, हिंगोली यांनी जिल्हा परिषद क्षेत्र जितक्या मतदार गटात विभागण्यात येईल त्या मतदार गटांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचिमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असुन , ज्या मतदार गटामध्ये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती , नागरिकांचा मागासप्रवर्ग  यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसुचित जाती,अनुसुचित जमाती,नागरिकांचा मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसह ) जागा राखुन ठेवण्यात येतील ते मतदार गट निर्दिष्ट करीत आहे. या आदेशाच्या तारखेच्या निकट  नंतरच्या  पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अमलात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
****    

औंढा-वसमत मार्गावरील वाहतूकीत बदल
हिंगोली, दि. 24 :- सहाय्यक मंडळ इंजिनियर कार्यालय, पुर्णा यांनी दि. 25 नोव्हेंबर, 2016 रोजीचे सकाळी 8.00 वाजता ते दि. 26 नोव्हेंबर, 2016 चे सकाळी 08.00 वाजता पावेतो रेल्वे गेट क्र. 165 at Km921/4-5 चे काम करावयाचे असल्याने औंढा-वसमत मार्गावरील वाहतूक वळविण्यात येत असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल भंडारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ख) अन्वये दि. 25 नोव्हेंबर, 2016 रोजीचे 8.00 वा. ते दि. 26 नोव्हेंबर, 2016 चे 8.00 वाजता पावेतो औंढा-वसमत मार्गावरील वाहतुक ही चौंढी ते कुरूंदा मार्ग वसमत व वसमत ते औंढा  मार्ग जाणारी वाहतुक कुरूंदा ते चौंढीकडून वळवुन औंढाकडे वळविण्यात येत आहे.

*****
विशेष केंद्रिय सहाय्य योजनेतंर्गत आदिवासी जमातींनी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 24 :  विशेष केंद्रिय सहाय्य योजने अंतर्गत खालील दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) लाभार्थ्यांकडून आवेदन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयात उपलब्ध असून इच्छुक लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांचे नावे योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील दर्शविल्याप्रमाणे परिपुर्ण कागदपत्रांसह आवेदन अर्ज दि. 15 डिसेंबर, 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहित मुदतीनंतर आलेले व परिपुर्ण नसलेले आवेदन अर्ज स्विकारले जाणार नाहीत. योजनेचे नाव, योजनेचा लाभ व सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहे.
1) जनउत्कर्ष, जनउत्थान महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत स्थापन करण्यात आलेल्या अथवा नव्याने स्थापित झालेल्या आदिवासी स्वयंसहाय्यता बचत गटांना व्यवसायाकरिता पोल्ट्री स्थापन करून देणे व प्रशिक्षण देणे : सामु‍हिक - 1) आ‍दिवासी स्वयंसहाय्यता बचतगट हे जनउत्कर्ष, जनउत्थान महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत स्थापन करण्यात आलेल्या अथवा नव्याने स्थापित झाल्याबाबतचे नोंदणीकृत प्रमाणपत्र जोडावे 2) बचत गटातील सर्व सभासद हे आदिवासी असावेत त्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र जोडावे 3) बचत गटातील कमीत कमी एका लाभार्थ्यांकडे एक एकर जमीन, बारामाही पाणी, वीज इत्यादी सुविधा असल्याचे  कागदपत्र. (सातबारा, विहिर नोंद, मोटार विजपंप, प्रमाणपत्र, चालु वर्षातील वीजबील, होल्डींग) 4) पोल्ट्रीफॉर्मसाठी घ्यावयाचे क्षेत्र/जमीन बचत गटाला किमान 5 वर्ष वापरण्यास देत असल्याबाबत जमीन मालकाचे व बचत गटातील सर्व सदस्य यांनी रुपये शंभर स्टॅम्प पेपरवर रजिस्टर हमीपत्र जोडावे 5) बचतगटाचे चालु व्यवहार असलेले पासबुकची झेरॉक्स प्रत जोडावी. 6) रहिवासी प्रमाणपत्र 7) ओळखपत्र 8) सदर योजनेचा यापुर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र 9) दोन पासपोर्ट साइज फोटो
2) दारिद्रय रेषेखालील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांच्या शेतात दर्जेदार फळ भाजीपाला विकसीत करणेकरिता शेडनेटची उभारणी करणे : वैयक्तिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र 2) लाभार्थ्यांच्या नावे दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र (गुणांकन क्रमाक व यादीतील क्रमांक नमुद असावा.) 3) लाभार्थ्यांचे नावाची जमीन असल्याचा सातबारा व 8 अ होल्डींग 4) रहिवासी प्रमाणपत्र 5) ओळखपत्र 6) लाभार्थी कृषी पदविका धारण करत असल्यास पदविका प्रमाणपत्र जोडावे 7) सदर योजनेचा यापुर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र 8) लाभार्थ्यांस किमान 0.60 हेक्टर जमीन असणे आवश्यक 9) जमीन सिंचनाखाली असल्याचे प्रमाणपत्र (वीजपंप/तेलपंप पुरावा) 10) वीज बिल चालु वर्षाचे.
3) अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांच्या शेतात शेततळ्याचे खोदकाम प्लास्टीक अस्तरीकरणासह करणे (दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांसाठी) : वैयक्तिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र 2) स्वत:च्या नावे एक हेक्टर जमीन असल्याचा सातबारा व 8 अ व होल्डींग जोडने आवश्यक 3) लाभार्थ्यांच्या नावे दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र (गुणांकन क्रमाक व यादीतील क्रमांक नमुद असावा.) 4) सदर योजनेचा यापुर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र 5) जमीन सिंचनाखाली असल्याचे प्रमाणपत्र (वीजपंप/तेलपंप पुरावा) 6) विज बील चालु वर्षाचे 7) रहिवासी प्रमाणपत्र 8) ओळखपत्र 9 दोन पासपोर्ट साईज फोटो.

                                                            ***** 
शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्यांचा पुर्नरिक्षण कार्यक्रम
·         प्रारुप मतदार यादीवर दावे हरकती स्विकारणे
हिंगोली, दि. 24:-   निवडणूक आयोगाने दिनांक 1 नोव्हेंबर, 2016 रोजीच्या अर्हता दिनांकावर आधारित शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी दिनांक 23 नोव्हेंबर, 2016 रोजी प्रसिध्द करण्यात आली असून दिनांक 1 ऑक्टोबर, 2016 ते दिनांक 5 नोव्हेंबर, 2016 या कालावधीत तालुका निहाय नोंदणी झालेल्या शिक्षक मतदारांचा तपशिल खालील प्रमाणे आहे.
.क्र.
तालुक्याचे नाव
महसूल मंडळ निहाय भाग
प्रारुप मतदार यादीतील मतदार संख्या
पुरुष
स्त्री
एकूण
1
हिंगोली
154 ते 160=07
525
108
633
2
कळमनुरी
161 ते 166=6
442
55
497
3
सेनगाव
167 ते 172=6
339
13
352
4
वसमत
173 ते 179=7
638
112
750
5
औंढा नागनाथ
180 ते 183=4
274
40
314
एकूण
154 ते 183=30
2218
328
2546

प्रसिध्द करण्यात आलेली प्रारुप मतदार यादी मा. विभागीय आयुक्त कार्यालय,औरंगाबाद , जिल्हा निवडणूक कार्यालय, हिंगोली , सर्व उपविभागीय कार्यालये सर्व तहसील कार्यालये जिल्हा हिंगोली येथे अवलोकनास्तव ठेवण्यात आलेली आहेत. प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप यादीवर दिनांक 23 नोव्हेंबर, 2016 ते 8 डिसेंबर, 2016 या कालावधीत दावे हरकती दाखल करता येणार आहेत. नागरिकांकडन प्राप्त होणारे दावे हरकती संबंधित तहसील कार्यालय येथे स्विकारले जातील . दावे हरकती दाखल करण्याकरिता लागणारे नमुने ( नमुना -19, नमुना-7 नमुना -8 ) जिल्हा निवडणूक कार्यालय, हिंगोली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालये तसेच जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये येथे उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील शिक्षक मतदारसंघाच्या मतदारांनी या मतदार नोंदणी कार्यक्रमाची नोंद घेवून आपले दावे हरकती विहीत वेळेत दाखल करण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी कळविले आहे.

*****