04 September, 2025

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

हिंगोली(जिमाका), दि. 4: जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करून व राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून हिंगोली येथील जिल्हा क्रीडा संकुलावर पुरुष खुला गट दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत अनिल शिंदे व नवाज खान या जोडीने प्रथम तर द्वितीय पारितोषिक अंकित राठोर व पियुष साहू या जोडीस मिळाले. तृतीय पारितोषिक संतोष कदम व आसाराम घुगे या जोडीने पटकावले. या पुरुष दुहेरी गटात सोळा संघाने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून आकर्षक ट्रॉफीसह पारितोषिक स्वरूपात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे कळमनुरीचे मुख्याधिकारी रविराज दरक, डॉ. श्रीधर कंदी, कृषी अधिकारी पंकज राठोड, दीपक अग्रवाल, अँड. दत्ता देशमुख, सचिन चौधरी, डॉ.योगेश नलवार, अतुल बोरकर उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कार्तिक यादव, रुपेश सोनी, देविकांत देशमुख, विवेक चिलमुल, बब्बू अग्रवाल, डॉ.अजय शिरडकर, नकुल राठोड, रवि पाटील, रामेश्वर अग्रवाल, जितेश धूत, शेख वासिम व अर्जून पवार यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर, क्रीडा अधिकारी गणेश बोडखे व क्रीडा मार्गदर्शक निळकंठ श्रावण यांचे मार्गदर्शन लाभले. **

No comments: