23 September, 2025

सेवा पंधरवाड्यानिमित्त तहसील कार्यालयात जनता दरबार संपन्न

हिंगोली, दि. 23 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाड्याच्या अनुषंगाने तहसील कार्यालय, हिंगोली येथे दि. 22 व 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जनता दरबार (लोक अदालत) आयोजित करण्यात आला. या जनता दरबारास आमदार तान्हाजी मुटकुळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, गट विकास अधिकारी विष्णू भोजे, नायब तहसीलदार तसेच महसूल सहाय्यक उपस्थित होते. यावेळी लाभ व सेवांचे वितरण आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. विविध विभागांतील एकूण प्रकरणांपैकी मोठ्या प्रमाणावर तातडीने निकाल लावण्यात आला. रस्ताविषयक 15 प्रकरणांपैकी 4 निकाली काढण्यात आली. कुळ कायद्यांतर्गत व म.ज.म.अ. कलम-155 मध्ये 11 प्रकरणांपैकी 7 निकाली काढण्यात आली. संजय गांधी योजना व इंगोयो – 13 पैकी 9 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तसेच मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू पावलेल्यांचे वारस सावित्रीबाई विलास वामन, रा. माळसेलू यांना 10 लाख रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला. याशिवाय घरकुल मंजूर झालेल्या 300 लाभार्थ्यांना प्रत्येकी पहिल्या हप्त्याचे 15 हजार रुपये या प्रमाणे एकूण 45 लाख रुपये थेट संबंधितांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. ******

No comments: