15 September, 2025
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागाची पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून बुधवारी पाहणी
हिंगोली, दि.15(जिमाका): जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे विविध भागात शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या भागाची राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे बुधवार (दि.17) रोजी पाहणी करणार आहेत. पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी करणार आहेत.
पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे 77 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमासाठी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आज येत आहेत. पालकमंत्री श्री. झिरवाळ हे मंगळवार, दि. 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री गुरुगोविंदसिंगजी विमानतळ, नांदेड येथून शासकीय विश्रामगृह हिंगोलीकडे प्रयाण करून सायंकाळी 7.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव असणार आहे.
बुधवार, दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता हिंगोली येथे आयोजित 77 व्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. शहरातील शिवाजीराव देशमुख सभागृह येथे सकाळी 10 वाजता आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर हिंगोली ते नर्सी नामदेव, पुसेगाव, सेनगाव येथे भेट देऊन पाहणी करणार आहेत.
दुपारी 12 ते 1 वाजेदरम्यान शासकीय विश्रामगृह, कळमनुरी येथे त्यांचे आगमन व राखीव वेळ असेल. पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे दुपारी 1 ते 3 वाजेदरम्यान कळमनुरी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या विविध भागांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत.
दुपारी 3 ते 4 वाजेदरम्यान औंढा नागनाथ येथील विश्रामगृह येथे त्यांचे आगमन व राखीव वेळ असेल. दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान पालकमंत्री श्री. झिरवाळ हे औंढा नागनाथ तालुक्यातील विविध अतिवृष्टीमुळे बाधित गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी करतील. सायंकाळी 6 वाजता त्यांचे वसमतकडे प्रयाण होईल. सायंकाळी 6.30 वाजता वसमत तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित भागाची पाहणी करून स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन केंद्रास भेट देऊन रात्री 8.30 वाजता हिंगोलीकडे प्रयाण करतील. रात्री 9.30 वाजता त्यांचे हिंगोली विश्रामगृह येथे आगमन व रात्री मुक्काम करतील.
पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे गुरुवार (दि.18) रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला उपस्थित राहून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी चर्चा करतील. सकाळी 11.30 वाजता पक्षकार्यकर्ते व विविध सहकाऱ्यांशी चर्चा व दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे गुरुवार (दि.18) रोजी दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment