15 September, 2025
हिंगोलीत गुरुवारी अमृत मेळावा
हिंगोली, दि. 15 (जिमाका): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत गायत्री भवन, हिंगोली येथे गुरुवार (दि.18) रोजी अमृत मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्याचे प्रमुख वक्ते अमृतचे विभागीय व्यवस्थापक दीपक जोशी, निमंत्रक जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत धोतरे व जिल्हा उपव्यवस्थापक संजय मेथेकर हे राहणार आहेत.
विद्यार्थ्यांना, युवक-युवतींना व उद्योजकांना मार्गदर्शन करून विविध सुवर्णसंधी उपलब्ध करून देणे हा मेळाव्याचा प्रमुख हेतू आहे. या मेळाव्यात माहिती, मार्गदर्शन व नोंदणी या विषयांवर विशेष भर दिला जाणार असून, हा मेळावा विद्यार्थ्यांसह उद्योजकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. अमृतचा हा मेळावा हिंगोली येथील गायत्री भवन, रेल्वे स्टेशन रोड, तापडिया हॉस्पिटल जवळ येथे दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याला विद्यार्थी, युवक-युवतींनी व उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment