24 September, 2025

शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे करणार हिंगोली जिल्हा अतिवृष्टी भागाचा दौरा

हिंगोली, दि. 24 (जिमाका) : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे हे उद्या दि. 25 सप्टेंबर, 2025 रोजी हिंगोली जिल्हा अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, (दि. 25) रोजी सकाळी 7 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाने वाशिम मार्गाने हिंगोलीकडे प्रयाण करणार आहेत. सकाळी 9.45 वाजता हिंगोली जिल्ह्यात आगमन आणि अतिवृष्टी भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. दुपारी 2 वाजता हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टी आढावा बैठकीस उपस्थित राहतील. त्यानंतर सोईनुसार हिंगोली येथून मालेगावकडे ते प्रयाण करतील. **

No comments: