30 September, 2025
‘पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा’ — दानशूर नागरिकांनी मदत करावी - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली, दि. ३० (जिमाका) :
राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व जीवनावश्यक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी समाजातील सर्व दानशूर व्यक्ती, संस्था व नागरिकांना ‘पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा’ या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. आर्थिक मदत तसेच औषधे, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य इत्यादी स्वरुपातील मदत स्वीकारली जाणार आहे.
जीवनोपयोगी वस्तू व अन्य साहित्य स्वरुपात मदत देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपल्या जिल्ह्यातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
💰 आर्थिक मदतीसाठी बँक खात्याची माहिती पुढीलप्रमाणे :
Account Name: Chief Minister's Relief Fund
Account Number: 10972433751, IFSC Code: SBIN0000300 तसेच अधिक माहितीसाठी नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 9321103103 वर संपर्क साधावा.
समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने पुढे येऊन पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गुप्ता यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment