23 September, 2025

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 15 मिमी पाऊस

• कुरुंदा व जवळा बाजार मंडळात अतिवृष्टी हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 15.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, औंढा नागनाथ तालुक्यात सर्वात जास्त 32.2 मि.मी. पाऊस झाला आहे. तर हिंगोली व सेनगाव तालुक्यात सर्वात कमी प्रत्येकी 2 मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 2.0 (888.3), कळमनुरी 12.5 (1087.8), वसमत 31.9 (1058), औंढा नागनाथ 32.2 (1071.3) आणि सेनगाव तालुक्यात 2.0 (830.1) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2025 ते 23 सप्टेंबर, 2025 पर्यंत सरासरी 980.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 129.1 अशी आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा व औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा या दोन मंडळात अतिवृष्टी झाली आहे. कुरुंदा मंडळात 65.3 मिमी तर जवळा बाजार मंडळात 66.3 मिमी प्रमाणे पावसाची नोंद झाली आहे. **

No comments: