27 September, 2025

जिल्ह्यातील शाळांना आज सुटी जाहीर

हिंगोली, दि.२७ (जिमाका): हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट तर हिंगोली व इतर ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आल्यामुळे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी जिल्ह्यातील शाळांना सुटी घोषित केली आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या निर्देशानुसार ही सुटी घोषित करण्यात येत असून, तसे आदेश त्यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक यांना दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आज शनिवार (दि.२७) रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. तसेच सदरील संदेश हा जिल्ह्यातील सर्व व्हॉट्स अँप ग्रूपवर तत्काळ पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबतचे पत्र पुन्हा देण्यात येईल, असेही त्यांनी या संदेशात म्हटले आहे. ******

No comments: