15 September, 2025

बँकांनी विविध योजनेत देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

• जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी घेतला विविध बँकांचा आढावा हिंगोली (जिमाका), दि. 15 : जिल्ह्यातील सर्व बँकांनी विविध योजनेचे देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्यातील सर्व बँकाचे शाखा व्यवस्थापक व जिल्हा प्रतिनिधी यांची आढावा बैठक घेण्यात आली . त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख जिल्हा व्यवस्थापक सुजित झोडगे व सर्व बँकेचे जिल्हा समन्वयक बैठकीला उपस्थित होते. तर इतर शाखा व्यवस्थापक ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री स्वनिधी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती विमा योजना, पशुसवंर्धन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना, किसान क्रेडिट कार्ड, बचतगटांना कर्जाची प्रकरणे तात्काळ मंजूर करुन त्याचा अहवाल सादर करावा. तसेच विविध योजनेत देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिले. *****

No comments: