17 September, 2025
पालकमंत्री नरहरी झिरवाळ आज घेणार कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
हिंगोली, दि.17 (जिमाका): राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे उद्या गुरुवार (दि.18) रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था आणि जिल्हा प्रशासनाचा आढावा घेणार आहेत.
त्यानंतर सकाळी 10.30 वाजता ते जिल्ह्यातील विविध विषयांवर प्रसार माध्यम प्रतिनिधींसोबत अनौपचारिक चर्चा करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पक्ष कार्यकर्ते व विविध सहका-यांसोबत चर्चा करणार आहेत.
दुपारी 1 ते 2 वाजेदरम्यान शासकीय विश्राम गृह येथे आगमन व राखीव वेळ असेल. त्यानंतर दुपारी 2 वाजता नांदेडकडे प्रयाण करतील.
आज बुधवार, (दि.17) रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर आज दिवसभरात पालक मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नुकसान झालेल्या भागातील शेतक-यांच्या बांधावर भेट देऊन पाहणी केली. तसेच नरसी नामदेव, पुसेगाव आणि औंढा नागनाथ येथील नागनाथाचे दर्शन घेतले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment