20 September, 2025

हिंगोली येथे अमृत मेळावा उत्साहात संपन्न

हिंगोली (जिमाका), दि. 20 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत आयोजित केलेला अमृत मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या अमृत मेळाव्याचे येथील गायत्री भवनामध्ये आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास विभागीय व्यवस्थापक दीपक जोशी तसेच कौशल्य विभागाचे योगेश जोशी यांची विशेष उपस्थिती होती. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना दीपक जोशी यांनी अमृतपेठ, अमृतवर्ग, व्याज परतावा योजना, स्वयंरोजगार संधी तसेच प्रशिक्षणाशी संबंधित विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. या योजनांचा प्रत्यक्ष लाभ कसा मिळविता येईल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच मेळाव्यातील इतर मान्यवरांनी या उपक्रमाचे आयोजन हे समाज प्रबोधन व स्वावलंबनाकडे नेणारे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मत व्यक्त केले. या मेळाव्यात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, एमकेसीएल, जिल्हा उद्योग केंद्र आदी संस्थांचे माहितीपर स्टॉल व प्रदर्शने लावण्यात आले होते. यावेळी मान्यवरांचे स्वागत जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत धोत्रे व उपव्यवस्थापक संजय मेथेकर यांनी केले. शेवटी अमृत सखी सौ. दिपाली कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. ******

No comments: