08 September, 2025

दसरा महोत्सवातील गाळे देण्यासाठी 15 सप्टेंबर रोजी बोली प्रक्रिया इच्छूकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 08 : येथील सार्वजनिक दसरा महोत्सव-2025 साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून औद्योगिक व कृषी प्रदर्शनीमधील व बाहेरील नकाशाप्रमाणे नियोजित तयार केलेले गाळे (दुकाने) महोत्सव दरम्यान (कालावधी 14 दिवस) विविध दुकाने थाटण्याच्या दृष्टिकोनातून भाडे तत्वावर देण्यासाठी जाहीर बोली बोलून हर्राशी करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे सदस्य तथा गटविकास अधिकारी यांच्या देखरेखीखाली बोली बोलण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. ज्यांची बोली जास्तीत जास्त रकमेला जाईल अशा इच्छूक धारकांना हे गाळे (दुकान) त्याच ठिकाणी पैसे भरुन देण्यात येणार आहे. इच्छूक धारकांनी वा व्यापाऱ्यांनी बोली बोलण्यासाठी रामलीला मैदान हिंगोली येथे दि. 15 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन हिंगोली सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे सचिव तथा तहसीलदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. ******

No comments: