22 September, 2025

वसमत येथे शुक्रवारी जनता दरबाराचे आयोजन

• नागरिकांनी लेखी स्वरुपात अर्ज, तक्रारी सादर करावेत हिंगोली (जिमाका), दि. 22 : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत दि. 17 सप्टेंबर, 2025 ते दि. 2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने हिंगोली जिल्ह्यात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. वसमत विधानसभा मतदार संघातील जनतेचे शासकीय प्रश्न सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व विधानसभा सदस्य यांच्या उपस्थितीत शुक्रवार, दि. 26 सप्टेंबर , 2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय, वसमत येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. वसमत विधानसभा मतदार संघातील वसमत व औंढा तालुक्यातील नागरिकांनी कोणत्याही शासकीय कार्यालयाकडे काम प्रलंबित असल्यास अथवा अडीअडचणी असल्यास त्याबाबत दि. 26 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता जनता दरबार, जनतेच्या शासकीय प्रश्नाचे निरासरण करण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने वसमत येथे एक खिडकी कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी दि. 19 ते 25 सप्टेंबर, 2025 या कालावधीत नागरिकांचे अर्ज, तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच दि. 26 सप्टेंबर, 2025 रोजी प्रत्यक्ष अर्ज, तक्रारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. नागरिकांनी आपले लेखी स्वरुपात अर्ज, तक्रारी अर्ज सादर करावेत, असे आवाहन वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले आहे. ******

No comments: