16 September, 2025
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
हिंगोली (जिमाका), दि. १६ : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उद्या बुधवार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता देवडा नगर येथील स्वातंत्र्य सैनिक अण्णाराव टाकळगव्हाणकर बाल उद्यानातील हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ येथे राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ८.४० वाजता हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले जाईल व मानवंदना दिली जाईल.
समारंभासाठी निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी १५ मिनिटे अगोदर उपस्थित राहावे. या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे, यासाठी इतर सर्व कार्यालये, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी ८.३० पूर्वी किंवा सकाळी ९.३० नंतर आयोजित करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
*जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8.05 वाजता ध्वजारोहण*
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उद्या बुधवार, (दि. 17) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी 8.05 वाजता जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तरी सर्वांनी या समारंभासाठी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी १५ मिनिटे अगोदर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment