11 September, 2025

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या बासटवार कृषी विकास केंद्राचा परवाना निलंबित

हिंगोली (जिमाका), दि. 11 : कृषी निविष्ठा विक्रीतील अनियमितता व शेतकऱ्यांच्या फसवणुकीसंदर्भात तक्रारीवरुन कृषी अधिकारी गुण नियंत्रण समीर वाळके यांनी बियाणे, कीटकनाशके कायद्यानुसार बासटवार कृषी विकास केंद्र हिंगोली या केंद्राची तपासणी केली असता यांच्याकडे साठापुस्तक नसणे, उगम प्रमाणपत्र विना माल विक्रीस ठेवणे, मुदतबाह्य निविष्ठांची शेतकऱ्यांना विक्री करणे इत्यादी गंभीर त्रुटी आढळून आलेल्या होत्या. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी तालुका कृषी अधिकारी गुण नियंत्रण व बासटवार कृषी विकास केंद्र यांची सुनावणी घेऊन संबंधित विक्री केंद्राचे बियाणे व कीटकनाशक परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आलेला आहे. तसेच रब्बी हंगामामध्ये सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी जिल्ह्यामध्ये गुणवत्तापूर्ण निविष्ठा शेतकऱ्यास विक्री कराव्यात. कोणीही बियाणे कायदा, कीटकनाशक कायदा व खत कायद्याचे उल्लंघन करणार नाही, याची काळजी घ्यावी, अन्यथा कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. *****

No comments: