23 September, 2025
कळमनुरी येथील मागासवर्गीय वसतीगृहातील प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
हिंगोली (जिमाका), दि. 23 : सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरात मागासवर्गीय मुलीचे शासकीय वस्तीगृह व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलाचे शासकीय वस्तीगृह अशी दोन वस्तीगृह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली यांच्या नियंत्रणाखाली सुरू आहेत. शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षात ऑनलाईन पद्धतीने प्रवेशासाठी अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. यासाठी अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबर 2025 पर्यत मुदत वाढ देण्यात आली आहे.
यासाठी कळमनुरी शहरातील मागासवर्गीय मुलीचे शासकीय वस्तीगृहात 100 विद्यार्थी प्रवेश क्षमता असून यामध्ये जुने प्रवेशित विद्यार्थी 92 आहेत. तर यावर्षी 8 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीगृहात 100 विद्यार्थी प्रवेश क्षमता असून यामध्ये जुने प्रवेशित विद्यार्थी 72 आहेत. तर यावर्षी 28 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या दोन्ही वस्तीगृहातील रिक्त असलेल्या 36 जागा सन-2025-26 मध्ये भरावयाच्या आहेत.
वरील प्रमाणे रिक्त जागेसाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर मागासवर्गीय मुला-मुलींनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रत आवश्यक कागदपत्रासह मागासवर्गीय मुलीचे शासकीय वस्तीगृह इंदिरानगर कळमनुरी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलाचे शासकीय वस्तीगृह मार्केट कमिटीच्या मागे कळमनुरी येथे जमा करण्यात यावे, असे आवाहन संबंधित वस्तीगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment