हिंगोली (जिमाका), दि. 25 : येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या कार्यालयात कै. अण्णासाहेब पाटील यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक बालाजी शिंदे यांनी उपस्थित लाभार्थ्यांना महामंडळाच्या योजनेची व त्यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. यावेळी महामंडळाचे लाभार्थी राम जाधव, पांडूरंग जगताप व अन्य लाभार्थी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment