08 September, 2025

गारमेंटवर आधारित उद्योजकांसाठी पाच दिवशीय कार्यशाळेचे आयोजन, आज नोंदणी करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 08 : महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र हिंगोली यांच्या वतीने आयोजित हिंगोली जिल्ह्यातील गारमेंटवर आधारित उद्योजकांसाठी कौशल्यवृध्दी विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजना, वस्त्रोद्योग क्षेत्रातील विविध कर्ज योजना, राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग धोरण, वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता वाढवण्याची योजना या विषयावर कार्यशाळेत मार्गदर्शन मिळणार आहे. ही कार्यशाळा दि. 11 सप्टेंबर, 2025 पासून पाच दिवस घेण्यात येणार आहे. यासाठी उमेदवार हा जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे व्यवसायाचे उद्यम नोंदणी प्रमाणपत्र आणि टीसी, पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्रे जमा करुन आपली नाव नोंदणी उद्या दि. 9 सप्टेंबर, 2025 पर्यंत करण्यात यावी. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक दत्ता उचितकर (मो. 9960189358) , महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे. *****

No comments: