22 September, 2025
औंढा येथे बुधवारी जनता दरबाराचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 22 : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत दि. 17 सप्टेंबर, 2025 ते दि. 2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे.
त्यानुषंगाने जनतेचे शासकीय प्रश्न सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. 24 सप्टेंबर , 2025 रोजी सकाळी 9 वाजता तहसील कार्यालय, औंढा नागनाथ येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
या जनता दरबारामध्ये तालुक्यातील सर्व विभाग, शासकीय निमशासकीय कार्यालयातील कार्यालय प्रमुख यांना जनतेच्या विविध प्रकारचे तक्रारी अर्ज, नागरिकांच्या मागण्या निवेदने, अर्ज इत्यादींचा सतेच तालुकास्तरावरील प्रलंबित महसूलविषयक बाबी, संवैधानिक प्रकरणे, उपविभागीय अधिकारी वसमत कार्यालयातील अपील प्रकरणे इत्यादींचा निपटारा करण्यात येणार आहे.
यासाठी औंढा नागनाथ तालुक्यातील जनतेनी आपली गाऱ्हाणे, अर्ज, निवेदन, तक्रारीबाबत उपस्थित राहावेत, असे आवाहन औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment