08 September, 2025

अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूकप्रकरणी जप्त वाहनांचा आज जाहीर लिलाव

हिंगोली (जिमाका), दि. 08 : अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात जप्त करण्यात आलेली वाहने सेनगाव तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेली आहेत. जप्त वाहने सोडविण्याबाबत संबधितांना वारंवार कळवूनही दंडाची रक्कम शासन जमा केलेली नाही. तसेच अवैध वाहतूक करताना वाहन जागेवर सोडून गेलेले वाहनांचे मालक दंडात्मक रक्कम भरण्यासाठी तहसील कार्यालयास आलेले नाहीत. अशा एका वाहनाचा जाहीर लिलाव उद्या मंगळवार, दिनांक 9 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय, सेनगाव येथे बोली पध्दतीने ठेवण्यात आला आहे. यासंबंधीच्या अटी व शर्तीबाबत तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार, सेनगाव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ******

No comments: