30 September, 2025

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा

• राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत निर्धारित निर्देशांकाची पूर्तता करावी हिंगोली (जिमाका), दि.30 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चक्रधर मुंगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नामदेव पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.सतीश रुणवाल, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, सहाय्यक संचालक (कुष्ठ रोग) डॉ. राहुल गीते, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग फोपसे, डॉ. सुनील देशमुख, डॉ.एन. आर. पवार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गजानन चव्हाण, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदीप काळे, डॉ. डी. व्ही. सावंत, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत पुठावार, डॉ.निशांत थोरात यांची उपस्थिती होती. या बैठकीत प्रामुख्याने एनकॉस संस्थेचा स्वतंत्र आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत निर्धारित केलेल्या निर्देशांकाची पूर्तता करावी. स्क्रीनींगचे प्रमाण वाढवावे. असांसर्गिक आजार कार्यक्रम अंतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेहा, कॅन्सर या आजाराचा सविस्तर आढावा घेऊन पोर्टलवर अपडेट करावा. या कामी कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधितावर कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच पूरग्रस्त गावामध्ये जलजन्य आजार व कीटकजन्य आजाराची साथ पसरू नये यासाठी दैनंदिन सर्वेक्षण करून वेळीच खबरदारी घ्यावी. पाणी नमुने, ब्लिचिंग पावडर नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात यावे, तापीचे रुग्ण वाढणार नाही याची काळजी घ्यावी, डेंग्यू, मलेरिया, अतिसार या सारख्या साथीचे आजार पसरू नये याची खबरदारी घ्यावी, अशा सक्त सूचना देण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी प्रसूतीचे प्रमाण वाढले पाहिजे, असांसर्गिक आजार कार्यक्रम, आरसीएच पोर्टलसह सर्व पोर्टल अपडेट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या. जिल्हा एड्स व नियंत्रण कक्षाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हा एड्स व नियंत्रण कक्षाचा आढावा घेतला. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाने एचआयव्ही/एड्स आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून कौतुकास्पद कामगिरी केली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डी. एस. चौधरी यांनी एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्ती व देहविक्रय करणाऱ्या महिलांना इतर सामाजिक लाभाच्या बाल संगोपन, संजय गांधी निराधार योजना, राशन कार्ड, बस पास, घरकुल योजना, मतदान कार्ड, इत्यादी योजनांचा लाभ देण्यात येत असून इतर नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याची माहिती दिली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नामदेव पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलाश शेळके, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग फोपसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.देवेंद्र जायभाये, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ राहुल गीते, आरसीएच अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश कोठूळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, विहानच्या श्रीमती अलका रणवीर, सेतूचे इरफान कुरेशी यांच्यासह डापकूचे संजय पवार, श्रीमती टिना कुंदनाणी, आशिष पाटील आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ******

No comments: