18 September, 2025

महाराष्ट्र बाल कामगार (प्रतिबंध व विनियमन) नियमांच्या प्राथमिक अधिसूचनेवर हरकती व सूचना आमंत्रित

हिंगोली (जिमाका), दि 18 : महाराष्ट्र बाल कामगार (प्रतिबंध व विनियमन) नियम, 2025 नियमांची प्राथमिक अधिसूचना महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेची प्रत सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या अधिसूचनेबाबत हरकती, सूचना असल्यास सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या कार्यालयाकडे अथवा कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयास कळविण्यात यावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी एस.जी.फड यांनी केले आहे. *****

No comments: