18 September, 2025

मोबाईल दुरुस्तीच्या मोफत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी 24 सप्टेंबरपूर्वी नोंदणी करावी

हिंगोली (जिमाका), दि.18 : येथील जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने सेनगाव तालुक्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतींसाठी मोबाईल दुरुस्तीचे मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी उमेदवार हा किमान 8 वी पास असावा व वय 18 ते 45 वर्ष असावे. यासाठी आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, टी.सी., बँक पासबुक जमा करुन 24 सप्टेंबर 2025 पर्यंत आपली नाव नोंदणी करावी. नाव नोंदणीकरिता व अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कार्यक्रम आयोजक दत्ता उचितकर (मो. 9960189358), द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे. ******

No comments: