06 September, 2025

श्री गणेशोत्सव काळात अवैद्य मद्य विक्रीवर छापे * ४ लाख ६६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

हिंगोली (जिमाका),दि.६: राज्य उत्पादन शुल्क हिंगोली विभागाने दिनांक ३, ४ व ५ सप्टेंबर २०२५ रोजी "श्रीगणेश उत्सव" काळात अवैध मद्य वाहतुकीवर करडी नजर ठेवत मोहीम राबवून राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक तसेच हिंगोली दुय्यम निरीक्षक बिट क्र. १,२,३ यांच्या पथकाने सेनगांव, कळमनुरी, हिंगोली, वसमत व औंढा नागनाथ परिसरात अवैध मद्य विक्री, वाहतूक विरोधात छापे टाकून ०३ आरोपीविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या कारवाईत देशी मद्याच्या १८० मिलीच्या ८०८ बाटल्या (१८० मिली बॉटलचे १७ बॉक्स) व १ चार चाकी वाहन, २ दुचाकी वाहन असा एकूण ४ लाख ६६ हजार २८० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन ०३ आरोपीविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. वरील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोहन मातकर, निरीक्षक भरारी पथक रमेश चाटे, दुय्यम निरीक्षक टी.बी. शेख, कृष्णकांत पुरी (बिट क्र.१ व ३), प्रदीप गोणारकर (बिट क्र. २), तसेच सहायक दुय्यम निरीक्षक श्री.कांबळे, जवान आडे, राठोड, वाहनचालक वाघमारे व इतर कर्मचारी यांनी पार पाडली. *****

No comments: