14 September, 2025
उर्ध्व पैनगंगा प्रकल्प प्रकल्पातून ११८०० विसर्ग सुरू * नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी
हिंगोली, दि.१४ (जिमाका): उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या इसापूर धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यात येत आहे. त्यामुळे आज रविवार (दि.१४) रोजी सकाळी ८:३० वाजता १५ दरवाजांपैकी ७ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून, सद्यस्थितीत धरणाच्या सांडव्यातून पैनगंगा नदीपात्रात ११८०० क्युसेक ( ३३४.१३१क्युमेक)इतका विसर्ग सुरु असल्याचे पूर नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले आहे.
तसेच सकाळपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरु असल्यामुळे आणि जयपूर बंधा-यातून येणा-या येव्यानुसार आज सकाळी ८:३० वाजता सद्यस्थितीत चालू असलेल्या दरवाजांच्या विसर्गात सांडव्याचे आणखी दोन दरवाजे उघडून विसर्ग वाढविण्यात आला आहे.
तसेच येणा-या येवानुसार विसर्गामध्ये टप्याटप्याने वाढ करण्यात येईल. त्यामुळे इसापूर धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
तरी, नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन इसापूर धरण पूरनियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment