18 September, 2025

शिष्यवृत्तीचे महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज 30 सप्टेंबरपूर्वी निकाली काढण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 18 : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना शासनाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. सन 2023-24 व 2024-25 या शैक्षणिक सत्रातील भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज मंजुरीसाठी शासनाकडून 30 सप्टेंबर, 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. भारत सरकार शिष्यवृत्तीचे अनुसूचित जाती प्रवर्गाचे शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील 99 अर्ज व 2024-25 मधील 292 अर्ज अद्यापही महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत. याबाबत सातत्याने पत्रव्यवहार, बैठका व व्हॉटस्अप ग्रुपवरील संदेशाद्वारे सूचना देऊनही महाविद्यालयाच्या लॉगिनवर अर्ज प्रलंबित आहेत. महाविद्यालयस्तरावर व विद्यार्थीस्तरावर प्रलंबित असलेले महाडीबीटी शिष्यवृत्तीचे सर्व पात्र अर्ज महाविद्यालयांनी दि. 30 सप्टेंबर, 2025 पर्यंत पाठवावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी केले आहे. ******

No comments: