26 September, 2025

दाटेगाव येथील गोबरधन प्रकल्पाचे शेखर रौंदळ यांच्या हस्ते उद्घाटन

हिंगोली (जिमाका), दि. 26 : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत स्वच्छता ही सेवा 2025 पंधरवाडा दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छोत्सव या थीम खाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आज हिंगोली तालुक्यातील दाटेगाव ग्रामपंचायत येथे गोबरधन प्रकल्पाचे राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, गटविकास अधिकारी विष्णू भोजे, माहिती शिक्षण व संवाद तज्ञ आशिष थोरात, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्राम विकास अधिकारी, जिल्हा कक्ष तज्ञ राजेंद्र सरकटे, श्यामसुंदर मस्के, विष्णू मेहत्रे, प्रशांत कांबळे, रघुनाथ कोरडे, राधेश्याम गंगासागर, नंदकिशोर आठवले व शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी ताई, ग्रामपंचायत सदस्य, गावातील बचत गटातील महिला व ग्रामस्थ युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. याप्रसंगी दाटेगाव ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात आलेल्या सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन, घंटागाडी शाळेतील स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, मंदिराची ठिकाणे, सार्वजनिक शौचालय व वैयक्तिक स्वच्छता, लोक सहभागातील कामे, स्मशानभूमीतील गार्डन याबाबत पाहणी करण्यात आली. तसेच एक झाड आईच्या नावाने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गावातील नागरिक, बचत गटातील महिला, युवक मंडळ, भजनी मंडळ, शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. ***

No comments: