30 September, 2025
कळमनुरी तहसीलमध्ये जनता दरबार • जनता दरबारामध्ये 687 प्रकरणे निकाली
हिंगोली (जिमाका), दि. 30 : छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दिनांक 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनांक 02 ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. या सेवा पंधरवाडा अंतर्गत टप्पा एक मध्ये पाणंद रस्ते विषयक मोहिम, टप्पा दोनमध्ये सर्वांसाठी घरे या उपक्रमासाठी पूरक उपक्रम आणि टप्पा 3 अंतर्गत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली नाविण्यपूर्व उपक्रमांतर्गत दि. 29 सप्टेंबर, 2025 रोजी कळमनुरी येथील तहसील कार्यालयामध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर, कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दि. 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.
या जनता दरबारामध्ये तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, बालविकास प्रकल्प कार्यालयातील अशा विविध कार्यालयामार्फत देण्यात येणारे प्रमाणपत्रे, दाखले, कार्यारंभ आदेश, कीट, तडजोडीची प्रकरणे व अर्धन्यायिक, संविधानिक प्रकरणे निकाली असे एकूण 687 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये बँक तडजोड प्रकरणे 10, अर्धन्यायिक प्रकरणे 38, संजय गांधी निराधार योजनेचे 30, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे 40, वय व अधिवास, मिळकत प्रमाणपत्र, अल्पभूधारक, जात प्रमाणपत्र, स्थानिक वास्तव्य दाखला, शेतकरी दाखल्याची 224, रोहयो तुती लागवड व कोष निर्मिती प्रशासकीय मान्यतेची 10, नवीन शिधा पत्रिका 45, मग्रारोहयो वैयक्तीक लाभाचे कार्यारंभ आदेश 30, प्रधानमंत्री आवास योजना शहरी बांधकाम परवानगी आदेश 05, बेबी केअर कीट 07 आणि ऐनवेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांकडे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने मांडलेल्या विविध 248 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.
यावेळी कळमनुरीचे तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्यासह तालुक्यातील सर्व कार्यालयाचे विभाग प्रमुख , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment