08 December, 2016

अनुसुचित जाती / जमातीतील उद्योजकांना लघु उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

हिंगोली,दि. 8 :- महाराष्ट्र शासनाच्या विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेतंर्गत अनुसुचित जाती / जमातीच्या पात्र उद्योजकांना खालील प्रोत्साहन देय करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची खालीलप्रमाणे पात्रता असणे आवश्यक आहे.
यामध्ये अनुसुचित जाती / जमातीच्या महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या उद्योजकांचे प्रोप्रायटर लघु उद्योग किंवा 100 टक्के भाग भांडवल असलेले भागिदारी / कंपनी सोसायटीद्वारे स्थापन केलेले उद्योग, लघुउद्योग स्थापनेसाठी जमिनीची खरेदी, कंपनी / सोसायटी/ भागीदारी संस्था यांची नोदणी लघु उद्योगांची नोंदणी आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची उद्योग स्थापनेची परवानगी (Consent to Establish) यापैकी एक परिणामकारक टप्पा दि.01 एप्रिल, 2013 नंतर पुर्ण केलेला असावा.
सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यास औद्योगिक प्रोत्साहन अनुदान, भुखंड अनुदान : भुखंड खरेदी / भाडेपट्टा किंमतीवर 20 ते 30 टक्के (रुपये 5 ते 10 लाख पर्यंत) अनुदान विशेष भांडवल अनुदान, विशेष भांडवली अनुदान : भांडवली गुंतवणूकीवर 15 ते 30 टक्के (रु. 15 ते 30 लाख मर्यादेपर्यंत ) विशेष भांडवली अनुदान, वीज दर अनुदान : वीज दरावर रु. 1 ते 2 प्रति युनिट 5 वर्षाकरीता अनुदान, व्याज अनुदान : स्थावर मालमत्ता स्थापन करण्यासाठी बँक / वित्तीय संस्थेकडुन घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीवर 5 टक्केपर्यंत व्याज अनुदान, विद्युत शुल्क माफी, मुद्रांक माफी, इतर प्रोत्साहन प्राप्त होणार आहे.
वरील प्रोत्साहना शिवाय अनुसुचित जाती / जमातीच्या उद्योग समुहांना शासनाच्या उद्योग समुह विकास योजनेतंर्गत सामायिक सुविधा केंद्र स्थापन करण्यासाठी तसेच अशा समुहांना रस्ते, पाणी, वीज इ.पायाभुत सुविधासाठी अनुदान देण्यात येते.
वरीलप्रमाणे पात्र लघु उद्योजकांनी www.di.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करावे आणि सामुहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत (पीएसआय) अर्ज सादर करावा किंवा पुढील माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली या कार्यालयाशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. बी. लाडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.  

*****
कोषागार कार्यालयातर्फे विभागीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन

हिंगोली, दि. 8 :- संचालनालय, लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समिती यांच्या वतीने होणाऱ्या विभागीय सांस्कृतिक वय क्रिडा स्पर्धा 2016 हिंगोली येथे दि. 10 व 11 डिसेंबर, 2016 रोजी संत नामदेव पोलीस कवायत मैदान, हिंगोली येथे मैदानी स्पर्धा व महावीर भवन, हिंगोली येथे सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.

***** 

07 December, 2016

विकलांग मुलांचे ‘त्वरित निदान व हस्तक्षेप’ करून विकलांगतेवर मात
हिंगोली, दि. 7 : अपंग कल्याण आयुक्तालय हे विकलांगांच्या कल्याणासाठी अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) अधिनियम 1995 अंतर्गत बऱ्याचशा योजना राबवित आहे. त्यात प्रामुख्याने विकलांग मुलांसाठी विशेष शाळांचा समावेश आहे. आज महाराष्ट्र राज्यात कर्णबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद व अंध प्रवर्गाच्या सुमारे 729 अनुदानित शाळा कार्यरत आहेत. बऱ्याचदा या शळांमध्ये वय वर्ष 6 नंतर मुले शिकण्यासाठी येतात.
शुन्य ते पाच वयोगटात विकलांग मुलांचे ‘त्वरित निदान व हस्तक्षेप (Early detection and Intervention’ झाल्यास त्यांना त्यांच्या विकलांगतेवर मात मिळवणे मोठ्या प्रमाणावर सहज शक्य होते. अशा प्रकारचा प्रयोग काही स्वयंसेवी संस्थांनी यशस्वीरित्या राबविलेला आहे. याची पाहणी करुनच आयुक्तालय आता शासनाकडे ‘आई शिकविते आईला’ या कार्यक्रमांतर्गत ‘होय, कर्णबधिर मुल बोलते’ ही अभिनव योजना सादर करत आहे. या योजने अंतर्गत कर्णबधिर मुलांचे ‘त्वरित निदान व हस्तक्षेप (Early detection and Intervention’ करून त्याला श्रवणयंत्र बसवून, वाचा उपचार देऊन पाच वर्ष वयापर्यंत हे मुल बालू कसे लागेल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. असे मुल बोलू लागल्यास ते सर्वसामान्य शाळेमध्ये जाऊन सहज शिकू शकेल. आयुक्तालयाने या योजनेसाठी शासनास प्रती कर्णबधिर मुलामागे रुपये 1 लाख अशी योजना प्रस्तावित केली आहे. ज्यात त्वरित निदान, रुग्णालयात जाऊन कानाची तपासणी करणे, श्रवणयंत्र बसविणे, आई समवेत मुलाने बालण्याचे प्रशिक्षण घेणे व शिकवणाऱ्या आईस/शिक्षकास मानधन या बाबींचा समावेश आहे.
हीच योजना मतिमंद मुलांसाठी सुध्दा राबविण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यांत येणार आहे. अशाप्रकारे आईच्या माध्यमातून या मुलांचे शाळेपूर्वीचे शिक्षण व हस्तक्षेप स्वयंसेवी संस्थांमार्फत करण्याची योजना आहे.
अपंगत्वाचे ‘त्वरित निदान व हस्तक्षेप (Early detection and Intervention’ या व्यतिरिक्त आईला घरच्या घरी आरोग्याच्या बाबतीत काय काय खबरदारी घेता येईल याबाबतचे मार्गदर्शन देण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आपल्या आहाराचे औषधी गुण, आजीबाईचा बटवा अंतर्गत घरात असलेल्या मसाल्याचे औषधी गुण, पोटसाफ ठेवून रोगापासून दूर राहणे, निसर्गोपचाराचे पाच पांढरे विष, योग्य प्रकारचे व्यायाम , योगासने, प्राणायम व मनाची उत्तम ठेव याबाबतही जनजागृती करण्याचा मानस आयुक्तालय करणार आहे. या अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्युट फॉर नॅचरोपॅथी, पुणे, अलीयावर जंग नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्पीच ॲण्ड हेअरिंग डिसेबलीटी, बांद्रा (मुंबई) आणि राष्ट्रीय मानसिक विकलांग संस्था, खारघर, नवीमुंबई या संस्थांची मदत घेतली जाणार आहे. तसेच जिल्हा परिषदेकडे असलेल्या अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका यांच्यामार्फत ‘त्वरित निदान व हस्तक्षेप (Early detection and Intervention’ व आरोग्याचे महत्वाचे पैलू ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्याचा मानस आहे.
3 डिसेंबर जागतिक अपंग दिन व 8 डिसेंबर राष्ट्रीय मानसिक विकलांग दिवस चे औचित्य साधून अपंग कल्याण आयुक्तालय लोकांना असे आव्हान करते की, मुळात रोग होवू नये व कदाचित झाल्यास व त्यामुळे अपंगत्व आल्यास त्याचे ‘त्वरित निदान व हस्तक्षेप (Early detection and Intervention’ करण्यासाठी शून्य ते सहा वयोगटातील मुलांवर जास्त लक्ष केंद्रीत करुन अपंगत्वावर मात मिळवण्यासाठी सर्वतोपरी उपाय करावे, ज्याने अपंगत्वावर मात मिळून मुलाचे सार्वजनिक जीवनात योग्य पध्दतीने समावेशन होईल. याबाबतचे प्रशिक्षण आयुक्तालय उपलब्ध करून देणार आहे. अधिक माहितीसाठी अपंग कल्याण आयुक्तालय, 3 चर्च पथ, पुणे - 411 001 येथे संपर्क साधावा. शासनाचे टोल फ्रि नंबर 1800 22 2014 यावर सर्व प्रकारच्या अपंगत्वाबाबत योग्य ती माहिती उपलब्ध आहे, असे अपंग कल्याणचे आयुक्त, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

***** 
परिवहन विभागाच्या रस्ता सुरक्षा विषयक उपक्रमाबाबत
माहिती पाठविण्याचे आवाहन
हिंगोली, दि.7 :-  रस्ता सुरक्षा संबंधात काम करणाऱ्या विविध व्यक्ती / संस्था यांची नांवे त्वरित कळविण्यात येणार आहेत. रस्ता सुरक्षा विषयक काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांनी त्यांचे कामाच्या संदर्भात पॉवर पॉईट सादरीकरण जास्तीतजास्त 15 स्लाईड तयार करुन उप प्रादेशिक परिवहन कार्याल, हिंगोली येथे सादर करावीत. त्यानंतर त्यांची नावे परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांना कळविण्यात येणार आहेत, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हिंगोली यांनी कळविले आहे. 

*****
समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत
 जिल्ह्याकरिता 10 हजार सिंचन विहिरीचे उद्दिष्ट
हिंगोली, दि. 7 : समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्याकरिता 10 हजार सिंचन विहिरीसह इतर वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या कामाचे उद्दिष्ट महात्मा गांधी नरेगा अंतर्गत प्राप्त झालेले आहे.

सिंचन विहिरी संख्या
शेततळे (संख्या)
वर्मी कंपोस्ट टाके (संख्या)
नाडेप टाके (संख्या)
फळबाग लागवड (हेक्टर)
शौचालय बांधकाम (संख्या)
शोषखड्डे (संख्या)
गाव तलाव / पारंपारीक / पाणी साठ्याचे नूतनीकरण व गाळ काढणे / जलसंधारणाची कामे (संख्या)
रोपे निर्मिती (संख्या)
वृक्ष लागवड (संख्या)
ग्राम सबलीकरण (संख्या)
10000
5600
2200
2200
180
2200
2200
1100
2200000
220000
1600

सदर वैयक्तिक लाभांतर्गत घ्यावयाच्या 07 प्रकारच्या कामांच्या लाभार्थी निवडीसाठी व सार्वजनिक लाभाच्या 4 प्रकारच्या कामांच्या अंमलबजावणीकरिता ग्रामस्तरावर विशेष ग्रामसभांचे आयोजन करून त्यामध्ये ग्रामसभेने निवडलेल्या पात्र लाभार्थ्यांचे विहित नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायतीने भरून घ्यावयाचे आहेत. ग्रामपांचायतीने सदर प्राप्त प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी पंचायत समिती / तहसील कार्यालय, संबंधीत यंत्रणाकडे सादर करावयाचे आहेत.
तांत्रिक  मान्यता प्राप्त प्रस्तावाना तहसीलदार / गट विकास अधिकारी पंचायत समिती / यंत्रणांचे सक्षम अधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता द्यावयाची आहे. प्रशासकीय मान्यता प्राप्त कामांची संबंधीत तांत्रिक अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय आखणी करून व प्रत्यक्ष कामास सुरूवात करून दि. 15 मार्च, 2017 पर्यंत सर्व कामे पुर्ण करून काम पुर्णत्वाचे प्रमाणपत्र ऑनलाईन करावयाची आहे.
वैयक्तिक सिंचन विहिर मंजुरीसाठी विशेष ग्रामसभेमध्ये निवडलेल्या लाभार्थ्यांचे विहित नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायतीव्दारे भरुन घेण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीव्दारे लाभधारकाची निवड करताना केंद्रशासनाने विहित केल्याप्रमाणे लाभार्थी संवर्गनिहाय मंजुरी करण्यात येणार आहे. सिंचन विहिरींच्या लाभार्थी निवडीची प्रक्रिया शासन नियमाप्रमाणे पारदर्शकरित्या करण्यात येणार असून यासाठी लाभार्थ्यांनी दलालामार्फत, एजंटामार्फत देण्यात येणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या आमिषांना, भुलथापांना बळी पडु नये. सर्व इच्छूक नागरिक, शेतकरी यांनी तात्काळ त्यांच्या संबंधीत ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 
सशस्त्र सेना दलाच्या सुरक्षेमुळे देशाची प्रगतीकडे वाटचाल
---  जिल्हाधिकारी अनिल भंडारी
·         सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहीमेचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते उद्घाटन

हिंगोली,दि. 7:- जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे सशस्त्र सेना दल शौर्य, गुणवत्ता, शिस्त व सेवाभाव या बाबतीत सर्वोत्तम असून संरक्षण दलाचे जवान व अधिकारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील देशाच्या सीमांचे रक्षण करतात. सशस्त्र सेना दलाने देशाला समर्थ सुरक्षा कवच प्रदान केले असल्यानेच देश प्रगतीकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीसी सभागृहात सशस्त्र ध्वज दिन संकलन मोहिमेचे उद्घाटन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उप जिल्हा निवडणुक अधिकारी श्री. रणवीर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. पवार, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी  यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. भंडारी म्हणाले की, सैनिकांसाठी निधी संकलन करणे हे समाजकार्यातील मोठे योगदान आहे. सैन्यातील सुमारे 90 टक्के सैनिक हे 35 ते 40 या वयात सेवानिवृत्त होतात. त्यांचे देशाच्या संरक्षणामध्ये मोठे योगदान आहे.
सशस्त्र सेना दल देशाचे रक्षण करण्यास सदैव सुसज्ज असते. त्याचप्रमाणे नैसर्गिक तथा मानवनिर्मित आपत्तीच्यावेळी देखील प्रतिकुल परिस्थितीत आपले कर्तव्य पार पाडत असते. ध्वज दिन हा सशस्त्र सेना दलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
यावेळी श्री. एच. पी. तुम्मोड म्हणाले की,  देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक कायम कार्यरत असतात. या सैनिकांच्या विविध कल्याणकारी उपक्रम व मदतीसाठी ध्वज दिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य असून यामध्ये सर्वांनी सैनिकांसाठी भरघोस निधी जमा करावा.
                                                                                         
यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या शर्टला सशस्त्र सेनेच्या ध्वजाची पोस्टेज स्टॅम्प आकाराची प्रतिकृती चिकटवून सशस्त्र ध्वज दिन निधी संकलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी 2016 या वर्षाकरिता उभारण्यात येत असलेल्या ध्वज निधीला आपले वैयक्तिक योगदान दिले. देशसेवा करीत असताना वीरगती प्राप्त झालेल्या जवानांचे कुटुंबीय तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत, अत्यंविधीसाठी आर्थिक मदत, मतीमंद पाल्यांना आर्थिक मदत, प्रशिक्षण, वसतीगृह आवास तसेच शिष्यवृत्तीसाठी ध्वज आदीकरीता ध्वज दिन निधी वापरण्यात येतो .
शासनामार्फत सन 2015 ध्वजदिन निधी संकलनाकरीता जिल्ह्यास 16 लाख 94 हजार रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतू, उदिष्टाच्या 112 टक्के म्हणजे 19 लाख उद्दिष्ट साध्य केले आहे. तर 2016 या वर्षाकरीता जिल्ह्यास 17 लाख 78 हजार 700 एवढे निधी संकलनाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
 यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते माजी सैनिकांच्या गुणवंत विद्यार्थीनी कुमारी आरती हनुमंतराव खंदारे आणि कुमारी विनया भागवत संभाजी यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच आभार प्रा. किशोर इंगोले यांनी मानले. 

****







आदिवासी विभागाच्या विविध योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 6 : केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन 2016-17 अंतर्गत दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) शेतकरी/सुशिक्षित बेरोजगार युवक/युवतींना योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांकडून आवेदन अर्ज मागविण्यात येत आहेत. विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयात उपलब्ध असून इच्छुक लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांचे नावे योजनेचा लाभ घेण्यासाठी परिपुर्ण कागदपत्रांसह आवेदन अर्ज दिनांक 21 डिसेंबर, 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीत. सदर लाभ घेण्याकरिता लाभार्थ्यांनी खालीलप्रमाणे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन आदिवासी विभागामार्फत केले आहे.
अ) उत्पन्न निर्मिती व वाढीच्या योजना -
1) आदिवासी शेतकऱ्यांना 85 टक्के अनुदानावर ताडपत्री पुरवठा करणे. वैयक्तिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, 2) रहिवासी प्रमाणपत्र, 3) तहसिलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 4) 7/12 व होल्डींग प्रमाणपत्र, 5) मतदानकार्ड/आधारकार्ड, 6) सदर योजनेचा यापुर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, 7) 2 पासपोर्ट साईज फोटो, 8) असल्यास दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र गुणांकन व यादितीला क्रमांकासह ग्रामसेवक यांचे चालु वर्षातील दिनांकाचे, 9) रेशनकार्ड.
2) प्रशिक्षीत आदिवासी महिला/पुरुषांना 85 टक्के अनुदानावर टु इन वन शिलाई व पिकोफॉल मशिन पुरवठा करणे. वैयक्तिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, 2) रहिवासी प्रमाणपत्र, 3) तहसिलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 4) मान्यताप्राप्त औद्योगीक प्रशिक्षण संस्था/शिवणकला प्रशिक्षण केल्याबाबतचे प्रमाणपत्र, 5) मतदानकार्ड/आधारकार्ड, 6) सदर योजनेचा यापुर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, 7) 2 पासपोर्ट साईज फोटो, 8) असल्यास दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र गुणांकन व यादितीला क्रमांकासह ग्रामसेवक यांचे चालु वर्षातील दिनांकाचे, 9) रेशनकार्ड, 10) सध्या शिलाईकाम करित असल्याचे स्वत:चे प्रतिज्ञापत्र.
3) आदिवासी महिला/पुरुषांना 85 टक्के अनुदानावर सिंगलफेस पिठगिरणी पुरवठा करणे. वैयक्तिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, 2) रहिवासी प्रमाणपत्र, 3) तहसिलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 4) घराचा नमुना 8 अ प्रमाणपत्र, 5) मतदानकार्ड/आधारकार्ड, 6) सदर योजनेचा यापुर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, 7) 2 पासपोर्ट साईज फोटो, 8) असल्यास दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र गुणांकन व यादितीला क्रमांकासह ग्रामसेवक यांचे चालु वर्षातील दिनांकाचे, 9) रेशनकार्ड, 10) चालु महिन्याचे विद्युत मीटरचे बिल.
4) आदिवासी महिला/पुरुषांना 85 टक्के अनुदानावर सिंगलफेस मिरची/मसाला कांडप मशिन पुरवठा करणे वैयक्तिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, 2) रहिवासी प्रमाणपत्र, 3) तहसिलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 4) घराचा नमुना 8 अ प्रमाणपत्र, 5) मतदानकार्ड/आधारकार्ड, 6) सदर योजनेचा यापुर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, 7) 2 पासपोर्ट साईज फोटो, 8) असल्यास दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र गुणांकन व यादितीला क्रमांकासह ग्रामसेवक यांचे चालु वर्षातील दिनांकाचे, 9) रेशनकार्ड, 10) चालु महिन्याचे विद्युत मीटरचे बिल.
ब) प्रशिक्षणाच्या योजना -
1) आदिवासी युवक/युवतींना मराठी/इंग्रजी टंकलेखन प्रशिक्षण देणे (अनिवासी) वैयक्तिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, 2) रहिवासी प्रमाणपत्र, 3) तहसिलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 4) 10/12 वी पास असल्याचे शैक्षणिक प्रमाणपत्र 5) बोनाफाईड सर्टिफिकेट, 6) मतदानकार्ड/आधारकार्ड, 7) अलिकडील काळात काढलेले 2 पासपोर्ट साईज फोटो, 8) अर्जावर मोबाईल नंबर नमुद करावा.
2) आदिवासी युवक/युवतींना संगणक (एमएससीआयटी) प्रशिक्षण देणे (अनिवासी) वैयक्तिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, 2) रहिवासी प्रमाणपत्र, 3) तहसिलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 4) 10/12 वी पास असल्याचे शैक्षणिक प्रमाणपत्र 5) बोनाफाईड सर्टिफिकेट, 6) मतदानकार्ड/आधारकार्ड, 7) अलिकडील काळात काढलेले 2 पासपोर्ट साईज फोटो, 8) अर्जावर मोबाईल नंबर नमुद करावा.
3) आदिवासी युवक/युवतींना पीएमटी/पीईटी/एनईईटी चे प्रशिक्षण देणे (निवासी) वैयक्तिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, 2) रहिवासी प्रमाणपत्र, 3) तहसिलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 4) 12 वीत असल्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र, 5) मतदानकार्ड/आधारकार्ड, 6) अलिकडील काळात काढलेले 2 पासपोर्ट साईज फोटो, 7) अर्जावर मोबाईल नंबर नमुद करावा. 
क) मानव साधन संपत्ती विकासाच्या व कल्याणात्मक योजना -
1) आदिवासी महिला बचत गटांना बिछायत भांडीपुरवठा पुरवठा करणे सामुहिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, 2) रहिवासी प्रमाणपत्र, 3) तहसिलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 4) आदिवासी महिला बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, 5) मतदानकार्ड/आधारकार्ड, 6) सदर योजनेचा यापुर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, 7) 2 पासपोर्ट साईज फोटो.
2) आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्याकरिता सायकल पुरवठा करणे. (8 ते 12 वी वर्ग) वैयक्तिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, 2) रहिवासी प्रमाणपत्र, 3) तहसिलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 4) बोनाफाईड प्रमाणपत्र/वसतिगृहात प्रवेशित असल्याचे गृहपाल यांचे प्रमाणपत्र, 5) मतदानकार्ड/आधारकार्ड, 6) अलिकडील काळात काढलेले 2 पासपोर्ट साईज फोटो, 7) अर्जावर मोबाईल नंबर नमुद करावा. 
विहित मुदतीनंतर आलेले व परिपुर्ण नसलेले आवेदन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत उपरोक्त योजनांमध्ये पुर्णत:/अंशत: बदल करण्याचा तसेच त्यापैकी कोणतीही योजना राबविण्याचा अथवा न राबविण्याचा निर्णय प्रकल्प अधिकारी यांनी राखुन ठेवलेला आहे, असे आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

*****