25 March, 2019

15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता दोन उमेदवारांचे चार नामनिर्देशन पत्र दाखल


15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता दोन उमेदवारांचे चार नामनिर्देशन पत्र दाखल

हिंगोली,दि.25: 15-हिंगोली  लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 करीता आज नऊ उमेदवारांनी 12 नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत, त्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

अ.क्र.
उमेदवारांचे नाव
पत्ता
पक्षाचे नाव
नामनिर्देशन पत्राची संख्या
1
चाऊस शेख जाकेर शेख महुमद
बौध्दनगर, बाजार गल्ली, हदगाव, ता. हदगाव, जि. नांदेड
इंडियन युनियन मुस्लीम लीग
02
2
अलताफ अहमद एकबाल अहमद
जवाहरनगर, बाबानगर जवळ, कवडे फर्निचरच्या मागे, नांदेड
इंडियन युनियन मुस्लीम लीग
01
3
गंगाधर दादाजी बलकी
मु. महागांव (श्री भांगेच्या घराजवळ) ता. महागाव, जि. यवतमाळ
अपक्ष
01
4
गंगाधर रामराव सावते
रा. दिघी, पो. विरसनी, ता. हिमायतनगर, जि. नांदेड
अपक्ष
01
5
वानखेडे सुभाष बापुराव
मु.पो. ल्याहरी ता. हदगाव, जि. नांदेड द्वारा मातोश्री निवास, वार्ड नं.2 हदगाव, जि. नांदेड
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
01
6
जयवंता विश्वंभर वानोळे
मु.पो. मुळझारा, ता. किनवट जि.नांदेड
अपक्ष
01
7
नारायण रामा पाटील
मु.पो. बिटरगाव, ता. उमरखेड, जि. यवतमाळ
बहुजन वंचित आघाडी
01
8
संदेश रामचंद्र चव्हाण
रा. हनवतखेड, पो. वाघाळा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा
अपक्ष
03
9
कोडींबा गौणाजी मस्के
हर्षनगर आसेगाव रोड, वसमत, ता. वसमत, जि. हिंगोली
आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
01

            आतापर्यंत एकुण अकरा उमेदवारांनी 16 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत.
******


22 March, 2019

15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता दोन उमेदवारांचे चार नामनिर्देश पत्र दाखल


 वृत्त क्र.104                                                 दिनांक : 22 मार्च  2019

15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता दोन उमेदवारांचे चार नामनिर्देश पत्र दाखल

हिंगोली,दि.22: 15-हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 करीता आज दोन उमेदवारांनी चार नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत, त्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

अ.क्र.
उमेदवारांचे नाव
पत्ता
पक्षाचे नाव
नामनिर्देशन पत्राची संख्या
1
कांबळे त्रिशला मिलींद
जांबराजा, ता. औंढा (ना.) जि. हिंगोली
अपक्ष
03
2
गजानन हरिभाऊ भालेराव
मु.पो. कनेरगाव (नाका) ता. जि. हिंगोली
अपक्ष
01


******

वृत्त क्र.105

15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता आज 41 नामनिर्देशन पत्रांचे वितरण

            हिंगोली, दि.20: 15-हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदार संघातून आज एकूण 27 जणांना 41 नामनिर्देशन पत्राचे वितरण करण्यात आले. दि. 19 मार्च, 2019 रोजी 18 जणांना 45  तर दि. 20 मार्च, 2019 रोजी 17 जणांना 21  नामनिर्देशन पत्राचे वितरण करण्यात आले होते. याप्रमाणे आतापर्यंत एकुण 62 जणांना 107 नामनिर्देशन पत्राचे वितरण करण्यात आले. सार्वजनीक सुट्यांचे दिवस वगळता नामनिर्देश पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख 26 मार्च असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभाग, हिंगोली यांनी कळविले आहे.
                                                                          ****


निवडणूक प्रसार माध्यम केंद्राचे उद्घाटन







हिंगोली,दि.22: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची आदर्श आचार संहिता 10 मार्च पासून लागू झाली असून, येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा माहिती कार्यालयात 15-हिंगोली लोकसभा निवडणूक-2019 करीता सुरु करण्यात आलेल्या प्रसार माध्यम केंद्राचे उद्घाटन आज अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार यांच्या हस्ते करण्यात आले.
 यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भाऊसाहेब जाधव, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, हिंगाली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्यासह पत्रकार अरुणा होकर्णे, नंदकुमार तोष्णीवाल, योगेश पाटील, विजय गुंडेकर, पिंटू नागरे, मकरंद बांगर, रमेश चेंडके, श्री. कांबळे आदींची उपस्थिती होती.
****


20 March, 2019

15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता आज 21 नामनिर्देशन पत्रांचे वितरण


15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता
आज 21 नामनिर्देशन पत्रांचे वितरण

            हिंगोली, दि.20: 15-हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता मतदारसंघातून आज एकूण 17 जणांना 21 नामनिर्देशन पत्राचे वितरण करण्यात आले. दि. 19 मार्च, 2019 रोजी 18 जणांना 45 नामनिर्देशन पत्राचे वितरण करण्यात आले होते. याप्रमाणे आतापर्यंत एकुण 35 जणांना 66 नामनिर्देशन पत्राचे वितरण करण्यात आले. आज  एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. सार्वजनीक सुट्यांचे दिवस वगळता नामनिर्देश पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख 26 मार्च असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभाग, हिंगोली यांनी कळविले आहे.
                                                                          ****       


लोकसभा निवडणूकीकरीता खर्चाच्या 12 प्रवर्गांतील 121 बाबींचे प्रमाणित दर अधिसूचित - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी


लोकसभा निवडणूकीकरीता खर्चाच्या 12
प्रवर्गांतील 121 बाबींचे प्रमाणित दर अधिसूचित
- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

हिंगोली,दि.20: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या संदर्भात निवडणूक खर्च कामकाजाच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली. निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक बाजारपेठेमध्ये सर्वेक्षण करून दरपत्रके मागवून आणि संबंधित सक्षम अधिकृत अभिकरणांकडून प्राप्त झालेल्या बाबनिहाय दरासंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून तसेच त्यांच्या सूचना विचारात घेवून 15-हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी निवडणूकीत उमेदवारामार्फत करण्यात येणाऱ्या खर्चाच्या विविध 12 प्रवर्गामधील 121 बाबींचे प्रमाणित दर अधिसूचित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिली.
जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, राजकीय पक्षांद्वारे निवडणूक प्रयोजनार्थ निवडणूक घोषित झाल्यापासून निवडणुकीचा निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापर्यंत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशोब विहीत नमुन्यात व विहीत पध्दतीने ठेवणे आणि तो निवडणूक आयोगास सादर करणे अनिवार्य आहे. राजकीय पक्ष, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्याद्वारे लोकसभा निवडणूकीत करण्यात येणाऱ्या सर्व खर्चाचे निवडणूक खर्च सनियंत्रण यंत्रणेमार्फत सनियंत्रण आणि परिनिरीक्षण केले जाणार आहे. अधिसूचित करण्यात आलेले प्रमाणित दर आधारभूत मानून सर्व लेखांकन पथकांनी उमेदवारांच्या संदर्भातील अभिरूप निरीक्षण नोंदवहीमध्ये खर्चाच्या नोंदी घेण्यात येणार आहेत.
लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या प्रत्येक उमेदवारास ज्या तारखेस तो नामनिर्देशित झाला होता ती तारीख आणि निवडणुकीचा निकाल घोषित झाल्याची तारीख या दोन्ही तारखांसह यादरम्यान त्याने केलेल्या किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशोब विहीत नमुन्यात व विहीत पध्दतीने ठेवणे आणि तो वेळोवेळी तपासणीसाठी प्राधिकृत यंत्रणेस उपलब्ध करून देणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी माहिती दिली.
****


15-हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणूक खर्च निरीक्षक एस.एम. सुरेंद्रनाथ यांची नियुक्ती



15-हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणूक
खर्च निरीक्षक एस.एम. सुरेंद्रनाथ यांची नियुक्ती

हिंगोली,दि.19: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता एस.एम. सुरेंद्रनाथ यांची निवडणुक खर्च निरीक्षक म्हणुन नियुक्ती केली असून आज त्यांचे आगमन झाले आहे.
निवडणूक निरिक्षक एस.एम. सुरेंद्रनाथ यांच्याशी संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9445955056 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. निवडणूक कालावधीत एस.एम. सुरेंद्रनाथ यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह, हिंगोली, जि. हिंगोली येथे असणार आहे. जिल्हा परिषदेचे गणेश वाघ उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.) यांची निवडणुक निरीक्षक उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.) यांचे संपर्क अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. असे जिल्हा निवडणूक यंत्रणेने कळविले आहे. 
****


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा परिक्षा 24 मार्च रोजी * जिल्ह्यातील 14 उपकेंद्रावर होणार परीक्षा * परिक्षा उपकेंद्रावर फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा परिक्षा 24 मार्च रोजी
* जिल्ह्यातील 14 उपकेंद्रावर होणार परीक्षा
* परिक्षा उपकेंद्रावर फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू.
                                                                                  
           हिंगोली,दि.20: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दूय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 दि. 24 मार्च, 2019  रोजी सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत हिंगोली मुख्यालयातील 14 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे.
            सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर डीजीटल डायरी, कॅलक्युलेटर, पुस्तके, पेपर्स, पेजर मायक्रोफोन, मोबाईल फोन कॅमेरा अंतर्भुत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, दुरसंचार साधने म्हणून वापरण्या योग्य कोणतीही वस्तु, बॅग्ज अथवा शासनाने बंदी घातलेल्या इतर कोणत्याही साहित्यासह परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास अथवा स्वत:जवळ बाळगण्यात सक्त मनाई करण्यात आलेली आहे. या परीक्षार्थीची बायोमेट्रीक पध्दतीने ओळख पडताळणी करण्यास सकाळी 9:30 वाजता सुरुवात होणार असल्याने सर्व परिक्षार्थीनी परीक्षा केंद्रावर 9:00 वाजता हजर रहावे.
          महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र दूय्यम सेवा पूर्व परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेची परीस्थिती हाताळण्यासाठी परीक्षा केंद्रावर फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.

****