06 January, 2021

पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

 



 

हिंगोली,दि.6: ‘दर्पण’ या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर यांची  जयंती  ‘पत्रकार दिन’ म्हणुन साजरी केली जाते. यानिमित्त येथील जिल्हा माहिती कार्यालयात आज बाळशास्त्री जांभेकर यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, तुकाराम झाडे, श्रीमती शांताबाई मोरे,  सुभाष अपुर्वा, कल्याण देशमुख, उत्तम बलखंडे, बाबाराव ढोकणे, श्याम सोळंके, गोपाल सरानाईक, नंदकिशोर कांबळे, विलास जोशी, रमेश वाबळे अरुण दिपके, सुनिल पाठक, विजय गुंडेकर आदी पत्रकार बांधवांची उपस्थिती होती

****

05 January, 2021

नाफेडद्वारे खरीप हंगाम तुर नोंदणी करण्याकरीता खरेदी केंद्र निश्चित

 

नाफेडद्वारे खरीप हंगाम तुर नोंदणी करण्याकरीता खरेदी केंद्र निश्चित

            हिंगोली(जिमाका),दि.5: केंद्र शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने खरीप हंगाम 2020-21 मध्ये तुर नोंदणी दि. 28 डिसेंबर,2020 पासून ऑनलाईन  पध्दतीने  सुरु  झालेली आहे. तुर नोंदणी करण्याकरीता पुढील तपशीलाप्रमाणे खरेदी केंद्र निश्चित करण्यात आली आसून त्या ठिकाणी नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे.

खरेदी केंद्राचा तपशील पुढील प्रमाणे आहे :

            (1) हिंगोली येथे प्रगती स्वयंरोजगार सेवा सह. संस्था , जुने जिल्हा रुग्णालयाच्या समोर, तोफखाना हिंगोली, केंद्रचालक अमोल काकडे मो. 8788487580. (2) कळमनुरी येथे कयाधु शेतकरी उत्पादक कं. मर्या. तोंडापूर, वारंगा फाटा ता. कळमनुरी केंद्र चालक महेंद्र माने मो. 9736449383. (3) जवळा बाजार येथे औंढा ना. तालुका सह.खरेदी विक्री संघ मर्या. जवळा बाजार  केंद्र चालक कृष्णा हरने मो. 9175586758.  (4) वसमत येथे वसमत तालुका सह. खरेदी विक्री संघ मर्यादीत वसमत केंद्र चालका सादर इंगोले मो. 8390995294 (5)  सेनगांव येथे श्री. संत भगवानबाबा  स्वयंरोजगार सेवा संस्था कोथळज, साई ॲग्रो इंडस्ट्रीज जिनिंग फॅक्ट्री, तोष्णीवाल कॉलेज समोर, हिंगोली रोड सेनगांव केंद्र चालक संदीप काकडे मो. 9823252707 तर (6) साखरा येथे विजयालक्ष्मी बेरोजगार सह.संस्था मर्या कोळसा साखरा ता. सेनगाव केंद्रचालक उमाशंकर माळोदे मो.9657260743 असा आहे.

            शेतकरी बांधवांनी आपल्या तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी संपर्क करुन नोंदणी करावी. नोंदणी करिता सोबत खरीप हंगाम 2020-21 मधील पीक पेरा नोंद असलेला तलाठ्याच्या सही शिक्यानिशीचा ऑनलाईन 7/12 आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स सोबत आणावे व बँक पासबुकवर शेतक-याचे नाव, खाते क्रमांक  आय.एफ.एस.सी.कोडा स्पष्ट असावा (जनधन बँक खाते किवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये). संबंधीत तालुक्यातील व तालुक्याला जोडलेल्या केंद्राच्या ठिकाणी तुर हमीभावाने खरेदी करण्याकरीता शेतक-यांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकारी परभणी/हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

****

 

03 January, 2021

जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

 




            हिंगोली(जिमाका),दि.3: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी  यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले .

****

01 January, 2021

मौजे वगरवाडी सर्वे क्र. 25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध

 


               हिंगोली(जिमाका),दि.1:  महाराष्ट्र जमीन  महसूल  अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील  कलम 33(1)(ख) व(प)  नुसार मौजे  वगरवाडी  ता. औंढा, जि.हिंगोली  येथील फायरींग रेंज सर्वे नं. 25 व 29 या परिसरात  दि.2 ते 15 जानेवारी, 2021 पर्यंत  पोलीस कर्मचाऱ्यांना  वार्षिक गोळीबारीचा सराव  करण्यास  परवानगी  देण्यात येत आहे.

            या कालावधीत पुढील अटी वर गोळीबार  सरावासाठी  मैदान उपलब्ध  करुन देण्यात येत आहे. सदर ठिकाण  धोकादायक  क्षेत्र म्हणून  घोषित करण्यात आले आहे. परिसरात  गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये. अशा सूचना  पोलीस अधिकारी यांनी  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  संबंधित  गावी सर्व संबंधितांना  द्याव्यात. तसेच तहसिलदार औंढा नागनाथ व पोलीस  स्टेशन हट्टा यांनी मौ. वगरवाडी  फायरींग बट व परिसरात  दवंडीद्वारे व ध्वनीक्षेपकाद्वारे  या आदेशाची प्रसिध्दी करावी, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

****

 

01 जानेवारी ते 17 जानेवारी वाहन तपासाणी विशेष मोहीमेचे आयोजन

 


 

हिंगोली (जिमाका), दि.01 : 32 व्या रस्ते सुरक्षा महिना-2021 अंतर्गत 18 जानेवारीपासून हिंगोली जिल्ह्यात रस्ते सुरक्षा अभियान होत असून, त्याची पूर्व तयारी म्हणून वाहतूक नियम मोडणाऱ्या विरोधात 01 जानेवारी ते 17 जानेवारीपर्यंत वाहन तपासाणी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 01 जानेवारी पासून विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवणे, वाहन चालवताना सिटबेल्टाचा वापर न करणे. बेदरकपने वाहन चालवणे, अवैध प्रवासी वाहतुक, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, प्रवासी वाहनातून माल वाहतुक करणे, भारक्षमतेपेक्षा अतिरिक्त मालवाहतूक करणे, वेगाने वाहन चालवणे, दारु पिऊन किंवा अंमली पदार्थांचे सेवन करुन वाहन चालवणे इत्यादी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई म्हणून अनुज्ञप्ती तसेच वाहन नोंदणी निलंबनाची कार्यवाही करण्यात येणार आहे.

            सदर मोहिमेसाठी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक श्री. कळंबरकर, श्री. माने, श्री. कोपुल्ला यांनी नेमणूक करण्यात आली आहे. तरी हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी रस्ते सुरक्षा अभियानाची पूर्वतयारी म्हणून 01 जानेवारी पासून हिंगोली जिल्ह्यात वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                                    ****

जिल्हा माहिती कार्यालयात माझी वसुंधरा अभियानातंर्गत घेतली ‘हरित’ शपथ


  

        हिंगोली (जिमाका), दि.01: माझी वसुंधरा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आज विविध कार्यालयात हरितशपथ घेण्याबाबत जिल्हाधिकारी  रुचेश जयवंशी यांनी आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयात हरित शपथ घेण्यात आली.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, वरिष्ठ लिपीक श्रीमती आशाताई बंडगर, लिपीक टंकलेखक अनिल चव्हान, कैलास लांडगे, संदेशवाह परमेश्वर सुडे उपस्थित होते.

 

****

निवड सूचीसाठी लोककला व पथनाट्य संस्थांनी 21 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत जिल्हा माहिती अधिकारी यांचे आवाहन

 


हिंगोली(जिमाका),दि.1: लोककला व पथनाट्य सादर करणाऱ्या संस्थांची निवड सूची 20 डिसेंबर रोजी संपुष्टात आली आहे. याबाबत नवीन निवड सूची तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लोककला व पथनाट्य सादर करणाऱ्या संस्थांनी निवड सूचीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे 21 जानेवारी पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी केले आहे.

निवड सूचीसाठी dgipr.maharashtra.gov.in व www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाबरोबरच जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे अर्ज उपलब्ध आहेत. तरी इच्छुक संस्थांनी निवड सूचीसाठीचे अर्ज गुरुवार, दि. 21 जानेवारी 2021 पर्यंत सादर करावेत, असे आवाहनही जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी केले आहे.

 

****