09 February, 2022

 

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी अनुदान मागणीचे अर्ज 18 फेब्रुवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 09 : जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगर परिषद शाळा व अंपग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाने दि. 7 ऑक्टोबर. 2015 च्या शासन निर्णयानुसार सन 2021-22 साठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगर परिषद शाळा व अंपग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी सन 2021-22 साठी अनुदान योजना राबविण्यात येणार आहे. अनुदानासाठी इच्छुक शाळांकडून दि. 7 ऑक्टोबर, 2015 च्या शासन निर्णयामध्ये  नमूद केलेल्या विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे दिनांक 18 फेब्रुवारी 2022 पर्यंत सादर करावेत. विहित तारखेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

 शिवछत्रपती क्रीडा पीठाअंतर्गत विविध क्रीडा प्रबोधनीमध्ये

सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीव्दारे प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 09 : राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास अद्ययावत क्रीडा सुविधा, क्रीडा प्रबोधनी अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत.

            राज्यातील क्रीडा प्रबोधनीमध्ये सेवा प्रवेश व खेळ निहाय कौशल्य चाचण्यांव्दारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. यामधे अमरावती - आर्चरी ज्युडो, नागपूर-हॅन्डबाल, अॅथेलेटिक्स, अकोला-बॉक्सिंग, गडचिरोली- अॅथेलेटिक्स, ठाणे-बॅडमिंटन, नाशिक-शुटींग, अथलेटिक्स, कोल्हापुर-शुटींग, कुस्ती, औरंगाबाद- अथेलेटिक्स, हॉकी, पुणे - टेबल टेनिस, वेटलिफ्टीग, जिम्नॅस्टीक या खेळांचा समावेश असून याची अर्हता खालील प्रमाणे आहे.

सरळ प्रवेश प्रक्रिया :  क्रीडा प्रबोधनीत असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्षाच्या आतील आहे. अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देवून प्रवेश निश्चित केला जाईल.

खेळनिहाय कौशल्य चाचणी : क्रीडा प्रबोधनीत असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना त्यांचे वय 19 वर्षाच्या आतील आहे,अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचण्यांचे आयोजन करुन गुणाणुक्रमे प्रवेश निश्चत केला जाईल.

अनिवासी प्रवेश प्रक्रिया : अनिवासी क्रीडा प्रबोधनीमध्ये प्रवेशासाठी अधिकृत राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय स्थान प्राप्त कऱणाऱ्या खेळाडूंना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. इतर खेळाडूंची त्यांच्या क्रीडा प्रकारानुसार विविध कौशल्यांची चाचणी घेऊन त्या आधारे खेळाडूंना प्रवेश देण्यात येईल.

विहित नमुन्यातील अर्ज, जन्म दिनांक व क्रीडा कामगिरीबाबत आवश्यक कागदपत्रांसह क्रीडा प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म दाखला इत्यादी माहितीसह  दिनांक 15 फेब्रुवारी, 2022 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कलीमओद्दीन फारुखी यांनी केले आहे.

*****

08 February, 2022

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 24 रुग्ण ; तर 59 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

·  914 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 08 : जिल्ह्यात 24 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक , हिंगोली यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे कळमनुरी परिसर 01 व्यक्ती, औंढा परिसर 02 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 02 व्यक्ती, औंढा परिसर 10 व्यक्ती व सेनगाव परिसर 09 व्यक्ती असे एकूण 24 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 59 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 02 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 19 हजार 287 रुग्ण झाले असून, त्यापैकी  17 हजार 971 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 914  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 402 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

****

04 February, 2022

मदरसांच्या आधुनिकिकरण योजनेअंतर्गंत सहायक अनुदानासाठी अर्ज आमंत्रित

 

मदरसांच्या आधुनिकिकरण योजनेअंतर्गंत सहायक अनुदानासाठी अर्ज आमंत्रित

हिंगोली (जिमाका) दि. 4 :- राज्‍यातील नोंदणीकृत मदरसांना पायाभूत सुविधा, ग्रंथालय आणि विषय शिक्षकांच्‍या मानधनासाठी सहाय्यक अनुदान सन 2021-22 साठी शास‍कीय अनुदान घेण्‍याची इच्‍छा आहे, अशा मदरसांकडून अल्‍पसंख्‍यांक विकास विभागाने अर्ज मागविले आहेत. इच्‍छुक मदरशांनी शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2013  मध्‍ये नमूद केलेल्‍या विहित नमुन्‍यातील परिपूर्ण अर्ज आवश्‍यक कागदपत्रे जोडून जिल्‍हा नियोजन समिती जिल्‍हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे 11 फेब्रुवारी 2022 पर्यंत सादर करावेत. अर्जाचा नमूना कागदपत्राची यादी  http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

ज्या नोंदणीकृत मदरशांमध्ये पारंपारिक, धार्मिक शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते त्या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षण देण्यासाठी शासकीय अनुदान घेण्याची मदरसांना इच्छा आहे त्यांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांनी केले आहे. 

विज्ञान, गणित, समाजशास्‍त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्‍याकरिता शिक्षकांसाठी मानधन.  पायाभूत सुविधा व ग्रंथालयासाठी अनुदान. शासन निर्णय 11 ऑक्टोंबर 2013 च्‍या तरतूदीनुसार मदरसामध्‍ये नियुक्‍त केलेल्‍या जास्‍तीत जास्‍त तीन डीएड / बीएड शिक्षकांना मानधन देण्‍यात येईल. विद्यार्थी व शिक्षक यांचे प्रमाण 40:1 असे राहील. शिक्षणासाठी हिंदी, इंग्रजी, मराठी, उर्दू यापैकी एका माध्‍यमाची निवड करून त्‍यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्‍यक आहे. ग्रंथालयासाठी तसेच विद्यार्थ्‍यांकरिता शैक्षणिक साहित्‍यासाठी एकदाच 50 हजार रुपये अनुदान देय आहे. पायाभूत सुविधासाठी जास्‍तीत जास्‍त 2 लाख इतक्‍या मर्यादेपर्यंत अनुदान देय आहे.

मदरशांच्‍या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, पेय जलाची व्‍यवस्‍था करणे, प्रसाधन गृह उभारणे व त्‍याची डागडुजी करणे, विद्यार्थ्‍यांसाठी आवश्‍यक फर्निचर, मदरसाच्‍या निवासस्‍थानात इन्‍वहर्टरची सुविधा उपलब्‍ध करणे, मदारसांच्‍या निवासी इमारतीचे नूतनीकरण व डागडुजी, संगणक,  हार्डवेअर, सॉफ्टवेअर, प्रिंटर्स इ.  प्रयोगशाळा साहित्‍य या योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्‍या पायाभूत या सुविधा आहेत. 

या योजनेंतर्गत लाभासाठी नोंदणी करून 3 वर्ष पूर्ण झालेल्‍या तसेच अल्‍पसंख्‍यांक बहुल क्षेत्रातील मदरशांना प्राधान्‍य देण्‍यात येईल. ज्‍या मदरशांना Scheme for Providing Quality Education in Madarsa (SPQEM) या केंद्र पुरस्‍कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरसांना ह्या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

000000

 

02 February, 2022

अनाथ प्रवर्गातून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी कु. कैलास ढोकर यांची निवड

 


अनाथ प्रवर्गातून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी  कु. कैलास ढोकर यांची निवड   

            हिंगोली, (जिमाका) दि.2 :-  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील एकूण 15 बालकांचे अनाथ प्रमाणपत्र प्रस्ताव विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास औरंगाबाद विभाग औरंगाबद यांना पाठविण्यात आले होते. त्यापैकी कैलास शेषेराव ढोकर यांची अनाथ प्रवर्गातून वैद्यकीय (MBBS) शिक्षणाकरीता निवड झाली. या निवडीबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अभिनंदन केले व अनाथ प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

  जिल्ह्यातील कैलास शेषेराव ढोकर या बालकाने अनाथ प्रमाणपत्र मिळणे करीता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, हिंगोली यांचेकडे अर्ज दाखल केला होता. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015अन्वये काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ, निराधार बालकांना संस्थेतून बाहेर पडल्यानंतर जातीचा दाखला नसल्यामुळे विविध शासकीय लाभांपासून वंचित रहावे लागते. त्यामुळे अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा या करीता अनाथांना शिक्षण व नोकरीमध्ये 1 टक्का आरक्षण लागू करण्यासाठी शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. 

            यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परिविक्षा अधिकारी, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक), बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) क्षेत्र बाह्य कार्यकर्ता  आदी उपस्थित होते.

00000

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2021 साठी प्रवेशिका पाठविण्यास 15 फेबुवारी पर्यंत मुदतवाढ

 

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2021 साठी

प्रवेशिका पाठविण्यास 15 फेबुवारी पर्यंत मुदतवाढ

हिंगोली, (जिमाका) दि.2 :-  राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दि. 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2022 असा होता. तथापि या प्रवेशिका पाठविण्यासाठी आता 15 फेब्रुवारी, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 जिल्हयातील स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे मुने dgipr.maharashtra.gov.in किंवा   www.maharashtra.gov.in   येथेही उपलब्ध आहेत.  

तरी या स्पर्धेत जिल्हयातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

****

01 February, 2022

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2021 साठी प्रवेशिका पाठविण्यास 15 फेबुवारी पर्यंत मुदतवाढ

 

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2021 साठी

प्रवेशिका पाठविण्यास 15 फेबुवारी पर्यंत मुदतवाढ

 

हिंगोली, (जिमाका)दि. 1 :-  राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दि. 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2022 असा होता. तथापि या प्रवेशिका पाठविण्यासाठी आता 15 फेब्रुवारी, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 जिल्हयातील स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे मुने dgipr.maharashtra.gov.in किंवा   www.maharashtra.gov.in   येथेही उपलब्ध आहेत.  

तरी या स्पर्धेत जिल्हयातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

****