26 November, 2019

26 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय हुंडाबंदी दिन साजरा करण्याचे आवाहन


26 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय हुंडाबंदी दिन साजरा करण्याचे आवाहन

        हिंगोली, दि. 26:  26 नोव्हेंबर हा जिल्हास्तरीय  हुंडाबंदी  दिन म्हणून दरवर्षी  साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने  दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस  हुंडाबंदी  दिन म्हणून  दरवर्षी  जिल्हास्तरावर साजरा करण्यात येतो.
या दिवसापासून  पुढचे सात  दिवस हुंडाबंदी  सप्ताह म्हणून  घोषित करण्यात यावा, या दिवशी राज्यातील शाळा  आणि महाविद्यालयामध्ये हुंडा या विषयावरील चित्रकला,वक्तृत्व स्पर्धा इ.कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, यादिवशी जिल्ह्यात ठिकठिकाणी महिला मेळावे आयोजित करण्यात यावेत, या मेळाव्यामध्ये महिला विषयक पुस्तके छापून त्याचे वितरण करावे, तसेच महिलांच्या कल्याणाकरिता शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात, त्या योजनांची माहिती महिलांना देण्यात यावी, मेळाव्यामध्ये हुंडा निर्मुलन,देवदासी  निर्मुलन  यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, महिला मेळाव्यामध्ये विविध वक्त्यांची भाषणे तसेच वादविवाद स्पर्धा आयोजित कराव्यात, समाजामध्ये महिलांबाबतच्या अनिष्ठ रुढी आहेत त्यांचे उच्चाटन करण्याकरिता तसेच महिलांमध्ये हक्काची जाणीव निर्माण  होण्याकरिता महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने इतरही अनके कार्यक्रम या दिवशी आयोजित करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांनी केले आहे.
000000






जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

            हिंगोली, दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमत्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
            यावेळी   अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) गोवींद रणविरकर, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख सुधीर जाधवर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्रीराम पारवेकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल कळसकर,  तहसिलदार जिवककुमार कांबळे, यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची  उपस्थिती होती.
*****




25 November, 2019

पाणी बचतीचे तंत्र वापरल्याखेरीज लाभधाराकांना जलाशयातील पाणी उपलब्ध होणार नाही


पाणी बचतीचे तंत्र वापरल्याखेरीज लाभधाराकांना जलाशयातील पाणी उपलब्ध होणार नाही

हिंगोली, दि.25: महाराष्‌ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम 2005 मधील कलम 14(4) नुसार बारमाही पिकांना निर्धारीत केलेल्या दिनांकापासून ठिबक सिंचन, तुषार सिंचन अथवा प्राधिकरणाने मान्यता दिलेले अन्य पाण्याची बचत करणारे तंत्र वापरल्या खेरीज कालव्यामधून पाणी दिले जाणार नाही. या बचतीमधून भविष्यातील वाढीव पिण्याच्या पाण्याची मागणी भागवून शिल्लक राहिलेले पाणी लाभक्षेत्रातील तसेच लगतच्या भागात समन्यायी तत्वावर वाटप करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिनांक 20 मे, 2019 च्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार क जुलै 12, 2019 नुसार जलसंपदा प्रकल्पातील जलाशयातील उपसा सिंचन योजनांना ऊस, केळी व फळबागा इत्यादी बारमाही पिकांसाठी, शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, तुषार सिंचन अथवा प्राधिकरणाने मान्यता दिलेले अन्य पाण्याची बचत करणारे तंत्र वापरल्याखेरीज 31 ऑक्टोबर 2020 नंतर जलाशयातून पाणी उपलब्ध करुन दिले जाणार नाही. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांची जलाशयातील पाणी उपसा परवानगी कालवा अधिकारीमार्फत रद्द केली जाईल. सर्व बागायतदारांनी, लाभधारकांनी ठिबक व तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावे असे आवाहन अधिक्षक अभियंता, नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड यांनी केले आहे.

***

21 November, 2019

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांसाठी 7 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांसाठी
7 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
 हिंगोली, दि.21: राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानांच्या योजनांबाबत इच्छूकांनी अधिक माहितीस्त्व आपल्या जिल्हयातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानांचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर करण्यात येणारे अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अपलोड करुन इंग्रजी, हिंदी भाषेत  भरावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना केले आहे.
भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकत्ता  यांच्या असमान निधी योजनेतर्गंत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. सन 2019-20 पासून असमान निधी योजनांसाठीचे विविध प्रस्ताव www.rrrlf.gov.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाव्दारे ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याबाबत प्रतिष्ठानकडून निर्देश देण्यात आले आहेत.
 असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज कसा करावा याबाबत www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावरील असमान निधी योजना या खिडकीखाली देण्यात आलेल्या User guide for applying online assistance यावर सविस्त्र माहिती व मार्गदर्शन करण्यात आले आहे.
या अर्जाची प्रिंट काढून अपलोड केलेल्या आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव चार प्रतीत संबंधीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 11 डिसेंबर 2019 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत सादर करावेत. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
असमान निधी योजना सन 2019-20 साठी  ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य. "राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा" विकसीत करण्यासाठी अर्थसहाय्य. महोत्सवी वर्ष जसे 50, 60, 75, 100, 125, 150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य. राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग जागरुकता कार्यक्रम आयोजनांसाठी अर्थसहाय्य. बाल ग्रंथालय राजा राममोहन रॉय ग्रंथालय कोपरा स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा ग्रंथालय अधिकारी, हिंगोली यांनी दिली आहे.
00000



19 November, 2019

जात वैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करुन घेण्याचे आवाहन


जात वैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करुन घेण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 19 : मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्र. 2723/2015 मध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या तत्कालीन जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांनी दिनांक 30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीत  निर्गमित करण्यात आलेल्या जात पडताळणी प्रमाणपत्र तपासणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने उक्त कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांनी त्यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, हिंगोली येथे जातीच्या दाव्यापुष्टयर्थ आवश्यक त्या कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती जी.डी. गुठ्ठे, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, हिंगोली यांनी केले आहे.
00000

जिल्हाधिकारी कार्यालयात इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त शपथ







 जिल्हाधिकारी कार्यालयात
इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त शपथ
हिंगोली, दि. 19 : - इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) गोविंद रणवीरकर यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्तची शपथही सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना देण्यात आली.  
तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त एकात्मतेची शपथही घेण्यात आली. यावेळी नायब तहसिलदार राजेंद्र गळगे आदिंसह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

कंत्राटी कर्मचारी भरती करीता 1 डिसेंबर रोजी लेखी परीक्षा


कंत्राटी कर्मचारी भरती करीता 1 डिसेंबर रोजी लेखी परीक्षा

हिंगोली, दि.19 : येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांचे अधिनिस्त असलेल्या पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत रसायणी, अणुजैविक तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा मदतनीस या कंत्राटी पदा करीता रिक्त असलेल्या जागेवर पदभरती करण्यासाठी जुलै-2018 मध्ये आवेदन पत्र मागविण्यात आले होते. त्यानुसार पात्र उमेदवारांची दि.1 डिसेंबर 2019 रोजी सकाळी  ठिक : 11:00 ते 12:00 या वेळेत आदर्श महाविद्यालय, हिंगोली येथे लेखी परीक्षा होणार आहे.
पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेणे करीता प्रवेशपत्र जिल्ह्याच्या www.hingoli.nic.in  या संकेतस्थळावर व प्रस्तुत कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच उमेदवारांच्या स्थानिक पत्यावर प्रवेशपत्र पोस्टाद्वारे पाठविण्यात आले आहेत, कोणास प्रवेशपत्र प्राप्त न झाल्यास दि.28 व 29 नोव्हेंबर 2019 रोजी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, हिंगोली या कार्यालयातून कार्यालयीन वेळेत (सकाळी 10:00 ते सांयकाळी 5:45) प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन वरिष्ठ भूवैज्ञानिक,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, हिंगोली यांनी केले आहे.
00000