27 September, 2022

जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने सर्वसाधारण प्रवर्गातील युवकांसाठी

सोलर टेक्नीशियनच्या मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील युवक व युवतीसाठी सोलर टेक्नीशियनच्या मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

            यासाठी उमेदवार हा किमान आठवी पास असावा. वय 18 ते 45 वर्षे असावे, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, टीसी, मार्क मेमो, बँक पासबूक जमा करुन दि. 01 ऑक्टोबर, 2022 पर्यंत आपली नाव नोंदणी करावी. नाव नोंदण्यासाठी  व अधिक माहितीसाठी किसन धाबे (मो.9370631461), कार्यक्रम आयोजक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. के. कादरी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी शंकर पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

****** 

 

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात सेवा हक्क कार्यक्रम संपन्न

 


हिंगोली (जिमाका), दि. 27 : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा या कालावधीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांचे वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून त्याचाच एक भाग म्हणून दि. 26 सप्टेंबर, 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,हिंगोली येथे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष  सुनिल महिंद्रकर यांच्या अध्यक्षतेखाली सेवा हक्क कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमासाठी सहाय्यक आुयक्त शिवानंद मिनगीरे, हिंगोली, वसमत व कळमनुरी येथील उपविभागीय कार्यालयातील प्रमुख कर्मचारी तसेच समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सुनिल महिंद्रकर यांनी सेवा हक्क अधिनियमाबाबत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.

                                                                        *****  

 


26 September, 2022

 

शासनमान्‍य सार्वजनिक ग्रंथालयांनी समान व असमान निधी योजनांसाठी

28 ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 26 : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येतात .

या समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातीत प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार सन 2022-23 साठी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भातील नियम , अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या  www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध ( download ) करुन घ्यावा .

सन 2022-23 साठीच्या समान निधी योजना (Matching Schemes) पुढील प्रमाणे आहेत .

 1) इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना : या योजने व्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पध्दतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत .

सन 2022-23 साठीच्या असमान निधी योजना पुढील प्रमाणे (Non Matching Schemes) :  1) ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्य, 2) राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान " ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य, 3) महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, 4) राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य, 5) बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय " बाल कोपरा स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य या असमान निधीच्या योजना आहेत.  

वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनो वरील पैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी / हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि. २८ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन शालिनी गो. इंगोले, प्र.ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई यांनी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना केले आहे .

                                                                        *****

25 September, 2022

 

पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जयंतीनिमित्त  जिल्हाधिकारी  कार्यालयात अभिवादन

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी  नायब तहसीलदार डी. एस.जोशी, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

*******

23 September, 2022

 

सेवा पंधरवाडानिमित्त मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात

युवती सक्षमीकरण कार्यक्रम संपन्न

 


            हिंगोली (जिमाका), दि. 23 : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा कालावधीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांचे वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दि. 22 सप्टेंबर, 2022 रोजी  मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,हिंगोली यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दर्गा रोड, हिंगोली येथे युवती सक्षमीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे हे होते. तर यावेळी जॉएन्ट्स ग्रुपचे रत्नाकर महाजन व प्रा.मयुरी पांचाळ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

            या युवती सक्षमीकरण कार्यक्रमासाठी  हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहातील व शहरातील महाविद्यालयीन 450 ते 500 विद्यार्थींनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला.    यावेळी प्रमुख मार्गदर्शक व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी उपस्थित युवतींना सखोल मार्गदर्शन करुन युवतींच्या सक्षमीकरणाबाबतची माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

            या कार्यक्रमासाठी  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व बार्टीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

                                                                        *****

 ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 ऑक्टोबर रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

  

हिंगोली (जिमाका), दि. 23 : ज्येष्ठ नागरिक दिन व सेवा पंधरवाडा विशेष मोहिमेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दि. 1 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दर्गा रोड, रिसाला बाजार, हिंगोली येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या आरोग्य शिबिरामध्ये जिल्हयातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त , समाज कल्याण, हिंगोली यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

*****

 

आयात-निर्यात करणारे व उद्योन्नमुख उद्योजकांनी

27 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 23 : येथील जिल्हा उद्योग केंद्रामार्फत गुंतवणूक वृध्दी, व्यवसाय सुलभीकरण, निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन या प्रमुख मुद्यांचा अंतर्भाव असलेली एकदिवशीय जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 27 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 10 ते 5 या कालावधीत जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेस एक्सपोर्ट कन्सलटंट फॅकल्टी औरंगाबादचे सुरेश पारीख, एसआयडीबीआय औरंगाबादचे भगवान चंदाणी, मैत्री कक्ष मुंबईचे श्री. महाजन, जिल्हा ॲग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशीकांत सावंत, जिल्ह्यातील सर्व बँकाचे जिल्हा समन्वयक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे हे प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व आयात-निर्यात करणारे तसेच उद्योन्नमुख उद्योजक यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन एस.ए.कादरी, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, हिंगेाली यांनी केले आहे.

*****