14 July, 2020

महिला व बाल विकास कार्यालयाला बाल विवाह थांबविण्यास यश

महिला बाल विकास कार्यालयाला बाल विवाह थांबविण्यास यश

 

हिंगोली,दि. 14: कळमनुरी तालूक्यातील मौजे. महालिंगी येथे एका अल्पवयीन मुलीचा दि. 12 जूलै रोजी बाल विवाह लावुन दिला जात असल्याची तक्रार चाईल्ड लाईनला प्राप्त झाली होती. सदर तक्रारीची दखल घेवून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी चाईल्ड लाईन यांच्या मदतीने बाल विवाह थांबविला.

लॉकडाऊनच्या काळात लगीन सराईला वेग आला आहे. कळमनुरी तालुक्यातील महालिंगी गावात बाल विवाहाचे नियोजन करण्यात आले होते. बाल विवाह होत असल्याची चाहुल लागताच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी गणेश मोरे, जरीब खान पठाण, ड. अनुराधा पंडीत, चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक संदीप कोल्हे, राजरत्न पाईकराव व विकास लोणकर, पो.कॉन्स्टेबल अमोल अडकीने यांनी महालिंगी गावातील ग्रामसेवक शेख शैनोद्दिन, सरपंच राठोड, पोलीस पाटील, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, अंगणवाडी ताई यांच्यासह मुलीच्या आई व मामा यांची भेट घेतली. तसेच बाल विवाह करणे हा कायद्याने गुन्हा असून या गुन्ह्याकरीता 1 लाख रुपये दंड व 2 वर्षापर्यंत सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकतात असे समुपदेशन केले. तसेच बाल विवाहाच्या दुष्परिणामा विषयी देखील समुपदेशन करण्यात आले. ग्राम बाल संरक्षण समिती समक्ष लेखी जबाब लिहुन घेवून बाल विवाह रोखण्यात आला.

****


No comments: