09 July, 2020

कोरोना रुग्ण बरे होण्यात हिंगोली जिल्हा राज्यात सर्वप्रथम

कोरोना रुग्ण बरे होण्यात हिंगोली जिल्हा राज्यात सर्वप्रथम

हिंगोली,दि.9: जिल्ह्यात आज रोजीपर्यंत कोरोनाची 314 व्यक्तींना लागण झाली असून त्यापैकी 263 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच व आज रोजी 51 कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार चालू असून त्यांची प्रकृती चांगली आहे. संचालक आरोग्य सेवा पूणे यांच्या अहवालानुसार हिंगोली जिल्हा कोरोना  विषाणूजन्य आजाराचे बाधीत रुग्ण बरे होण्यामध्ये (Recovery Rate ) महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकावर आला आहे. ही  जिल्ह्याकरीता अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. तसेच मृत्यूच्या दरामध्ये देखील हिंगोली जिल्हा महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांमध्ये  शेवटच्या तिसऱ्या क्रमांकावर असून, जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण हे केवळ 0.3 एवढे आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या तुलनेनुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचे रुग्णांच्या संख्येमध्ये दुप्पट होण्याचे प्रमाण हे 42 दिवसानंतरचे आहे

जिल्ह्यात परदेशातून, परराज्यातून तसेच इतर जिल्ह्यातून 14 मार्च पासून 47 हजार 766 नागरिक आले आहे. या आलेल्या सर्व नागरिकांची वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांचेमार्फत पुर्वनियोजन करुन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणी नंतर ज्यांना कोरोनाची चिन्हे, लक्षणे आढळून आली त्यांना शासकीय क्वारंटाईन करुन त्या व्यक्तींचा थ्रोट स्वॅब घेवून वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे पाठविण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी नगर परिषद यांच्या नियंत्रणाखाली जिल्ह्यातील 1 हजार 008 आशा स्वयंसेविका, 37 गट प्रवर्तक, 1 हजार 214 अंगणवाडी कार्यकर्त्या, 503 आरोग्य कर्मचारी, 119 समुदाय आरोग्य अधिकारी, 64 वैद्यकीय आरोग्य अधिकारी व 5 तालुका आरोग्य अधिकारी या सर्वांच्या कठोर परिश्रमामुळे व सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार यांच्या सर्वांच्या सहकार्याने कोरोना विषाणूजन्य आजाराची कोरोना विषाणूबाबत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जनजागृती करत आरोग्य शिक्षण देण्यात आले.

जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी, नगर परिषद प्रशासन, महसूल प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन आणि विविध विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रमाचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

****

 


No comments: