03 July, 2020

रुग्णवाहिका भाडेदरात सुधारणा · रुग्णवाहिकेचे दर निश्चित


      हिंगोली, दि.3 : जनहित याचिकेच्या आदेशानुसार रुग्णवाहिकांचे भाडे दर सुधारणेबाबतचा ठराव प्राधिकरणाच्या बैठकीत ठेवण्याबाबत व त्याबाबत परिचलन पध्दतीने ठराव घेऊन निर्णय घेण्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाचे सूचित केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, हिंगोली यांनी दि. 29 जून, 2020 रोजी घेतलेल्या बैठकीत ठरावाद्वारे रुग्णवाहिकांचे दर निश्चित केले आहेत. बैठकीत घेतलेल्या ठरावानुसार रुग्णवाहिकेचे दर पुढील प्रमाणे असणार आहेत. यात  मारुती व्हॅन चे भाडेदर 25 कि.मी. साठी रु. 700/- तर दोन तासांकरिता 14 रुपये, टाटा सुमो व मॅटॅडोर सदृश्य कंपनीचे बांधणी केलेली वाहने 25 किलोमीटरसाठी - 840 रुपये, तर दोन तासांकरिता 14 रुपये, टाटा 407 स्वराज माझदा आदीच्या साठ्यावर बांधणी केलेली वाहने 25 किलोमीटर साठी 980 रुपये तर 20 रुपये दोन तासांकरिता, आय.सी.यु. अथवा वातानुकुलित वाहने 25 किलोमीटर साठी 1190 रुपये तर 24 रुपये दोन तासांकरिता असे भाडेदर निश्चित करण्यात आले असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

****


No comments: