03 July, 2020

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केली जिल्हा रुग्णालयाची पाहणी · कोरोना बाधीत रुग्णांशी साधला संवाद




हिंगोली,दि.3: येथील डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल, हिंगोली व कोरोना केअर सेंटर, हिंगोली येथे आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रत्यक्ष भेट देवून आय.सी. यु. मधील व्हेंटीलेटर, मल्टीपॅरा, मॉनीटर आदी व्यवस्थेची पाहणी केली. तसेच यावेळी येथील रुग्णांवर उपचार करणाऱ्या तज्ञ वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या सोबत चर्चा केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद  श्रीवास, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. गोपाल कदम, डॉ. नामदेव पवार, अधिपरीचारीका ज्योती पवार आदीची उपस्थिती होती.
यावेळी जयवंशी यांनी आरो प्लॅट, डायलेसीस मशीन, नवजात शिशु कक्ष, प्रसुती वार्ड याठिकाणी भेट देवून थेट रुग्णांशी चर्चा केली. तसेच लिंबाळा येथील क्वॉरंटाईन सेंटरला भेट देवून क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांशी संवाद साधत त्यांना मिळत असलेल्या सुविधांची माहिती घेतली. तेथील स्वछता गृह व संपुर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी रुग्णांना त्यांना मिळत असलेल्या वैद्यकीय सेवेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कोरोना बाधीत रुग्णांचे समुपदेशन करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

****



No comments: