20 October, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन रुग्ण नाही, तर 06 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 20 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आला नाही, तर 06 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 48 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 648 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 06 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 394 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

No comments: