14 October, 2021

 वसमतनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयात

6 वी वर्गाच्या प्रवेश परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करावे

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 14 : जिल्ह्यातील वसमतनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयात 6 वी वर्गाच्या प्रवेशासाठी दि. 30 एप्रिल, 2022 रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या प्रवेश परिक्षेसाठी         दि. 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

संबंधितांनी www.navodaya.gov.in  या संकेतस्थळावर Click Here to submit Online Application form for class VI (2021-22) येथे जाऊन विनामूल्य विद्यार्थ्याचे ऑनलाईन अर्ज करता येते. यात विद्यार्थ्यांचा जन्म दिनांक 01 मे, 2009 ते 30 एप्रिल, 2013 दरम्यान असणे आवश्यक आहे.

यासाठी हिंगोली जिल्ह्यातील चालू शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये इयत्ता 5 वर्गात शिक्षण घेत असलेल्या सर्व शासकीय, निमशासकीय मान्यता प्राप्त शाळेतील विद्यार्थी सलग्न तीन शैक्षणिक वर्ष 2019-2020, 2020-2021, 2021-22 मध्ये तिसरी, चौथी व पाचवी वर्गात खंड न पडता उत्तीर्ण होऊन शिक्षण घेणे आवश्यक आहे. ही प्रवेश परीक्षा हिंगोली जिल्ह्यातील तालुकानिहाय संबंधित परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. संबंधित शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांनी विद्यार्थ्यांचा अर्ज ऑनलाईन करताना काळजीपूर्वक भरावा व त्यातील माहिती सत्य व खरी असणे आवश्यक आहे, असे प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, वसमतनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवले आहे.

*******

No comments: