18 October, 2021

 

सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या विषयासह देशभक्ती व राष्ट्रनिर्माण

विषयावर भाषण स्पर्धेचे आयोजन

 

हिंगोली, दि. 18 (जिमाका) :  येथील नेहरु युवा केंद्र, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या द्वारे हिंगोली जिल्ह्यात ‘‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’’ या विषयासह देशभक्ती व राष्ट्र उभारणीवर घोषणा भाषण स्पर्धेचे तालुका, जिल्हास्तरावर आयोजन करण्यात आलेले आहे. भाषण देण्यासाठी फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करुन 5 मिनिटामध्ये सदर विषयावर भाषण द्यावयाचे आहे.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सहभागी स्पर्धकाचे वय दि. 01 एप्रिल, 2021 ला 18 वर्षाच्या वर व 29 वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे. ज्यांनी 2015-16, 2016-17, 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या वर्षी या स्पर्धेत भाग घेतला असल्यास त्यांना पुन्हा या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.

जिल्हास्तरावरील स्पर्धेत प्रथम येणाऱ्या स्पर्धकास प्रथम बक्षीस 5 हजार रुपये, द्वितीय बक्षीस 2 हजार रुपये, तृतीय बक्षीस 01 हजार रुपये असून त्यासोबत प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. जो स्पर्धक जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करेल त्याला राज्यस्तरावरील स्पर्धेत सहभागी होता येईल. राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्या स्पर्धकास 25 हजार रुपये, द्वितीय येणाऱ्यास 10 हजार रुपये , तर तृतीय येणाऱ्यास 5 हजार रुपये व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्या स्पर्धकास राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेता येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 2 लाख रुपये, द्वितीय बक्षीस 01 लाख रुपये, तृतीय बक्षीस 50 हजार रुपये याप्रमाणे असून त्यासोबत प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या स्पर्धकास युवादूत बनविण्यात येणार असून त्याला राष्ट्र निर्माणाच्या विभिन्न कार्यक्रमाध्ये सहभागी होण्यासाठी सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे. या स्पर्धा दि. 30 ऑक्टोबर, 2021 पूर्वी घेण्यात येणार आहेत. यासाठी सर्व युवकांनी आधारकार्ड ची झेरॉक्स प्रत व पासपोर्ट साई फोटोसह नेहरु युवा केंद्र हिंगोली कार्यालयामध्ये येऊन नोंदवावीत.

हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण गावातील, तालुक्यातील तसेच ग्रामीण शहरी भागातील 18 ते 29 वयोगटातील युवक युवतींनी जास्तीत जास्त संख्येने या राष्ट्र कार्यात सहभागी होऊन बक्षीसे जिंकावीत व आपल्या जिल्ह्याचा गौरव वाढवावा. यासाठी नेहरु युवा केंद्र, नाईक नगर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर,हिंगोली  येथे प्रत्यक्ष येऊन संपर्क करावे.  अधिक माहितीसाठी व अर्जाचा तपशील भरण्यासाठी एनवायकेएसच्या www.nyks.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.   

*****

No comments: