15 October, 2021

 



जिल्हाधिकारी कार्यालयात  डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन 

 

हिंगोली, दि. 15 (जिमाका) :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, जिल्हाधिकारी कार्यालयातील व मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील अधिकारी, कर्मचारी यांनीही डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****

No comments: