13 October, 2021

 

आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत ई श्रम कार्ड निशुल्क

केंद्र चालकांने पैशाची मागणी केल्यास तक्रार नोंदवावी, दोषींवर परवाना निलंबनाची कारवाई

 

हिंगोली, (जिमाका) दि. 13 : प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना (ई श्रम योजना) असंघटीत कामगारांसाठी राबविण्यात येत आहे. यामध्ये बांधकाम कामगार, शेती काम करणारे मजूर, भाजी आणि फळविक्रेते, मच्छिमार, सुतार, वृत्तपत्र विक्रेते, यंत्रमाग कामगार, चामड्याच्या उद्योगात काम करणारे कामगार, रिक्षाचालक, घरगुती कामगार आणि इतर असंघटित कामगारांचा समावेश आहे.

यासाठी आपले सरकार सेवा केंद्रा (सीएससी) मार्फत ई श्रम कार्ड निशुल्क देण्यात येत आहे. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्राच्या चालकांकडून ई श्रम कार्डासाठी पैशाची मागणी करत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी जवळच्या तहसीलदार यांच्याकडे पुराव्यासह तक्रार नोंदवावी. संबंधित आपले सरकार सेवा केंद्र चालक दोषी आढळून आल्यास त्यांचा परवाना तात्काळ कायमस्वरुपी निलंबित करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी व अधिक माहितीसाठी https://eshram.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.  

****

No comments: