06 October, 2021

 

रस्ता सुरक्षा  क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती , संस्थांनी

केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा योजनेसाठी माहिती सादर करण्याचे आवाहन

 

          हिंगोली, (जिमाका) दि. 06 : केंद्र शासनाने रस्ता सुरक्षा संदर्भात नवीन योजना राबविणार आहे. या योजनेचे नाव ‘‘ फायनाशियल असिस्टंन्स फॉर ॲमिनिस्टरींग रोड सेफ्टी ॲडव्होकशी ॲन्ड ॲवार्डस फॉर द ऑऊटस्टँडींग वर्क डन इन द फिल्ड ऑफ रोड सेफ्टी’’ (Financial Assistance for Aministering Road Safety Advocacy and Awards for the Outstanding Work done in the field of Road Safety) असे आहे. 

केंद्र शासनाच्या या योजनेमध्ये जिल्ह्यात उत्कृष्ट, अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांची माहिती सादर करण्याबाबत कळविले आहे. या योजनेबाबतची सर्व माहिती सूचना केंद्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

हिंगोली जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा अंतर्गत काम करणाऱ्या व्यक्ती , संस्थांनी केलेल्या कामाचा सविस्तर अहवाल या योजनेमध्ये दिलेल्या निर्देशानुसार व विहित नमुन्यात दि. 25 ऑक्टोबर, 2021 पर्यंत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे सादर करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

No comments: