07 October, 2021

 

मूग, उडीद, सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्यासाठी  आधारभूत खरेदी  केंद्र निश्चित

खरेदी केंद्रावर नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 7 : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने खरीप  हंगाम 2021-22 मध्ये मूग, उडीद, सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. या खरेदी केंद्राच्या ठिकाणी  मूग, उडीद खरेदी करण्यासाठी दिनांक 5 ऑक्टोबर 2021 पासून नोंदणी सुरु आहे, तर सोयाबीन खरेदीसाठी दि.15 ऑक्टोबर 2021 पासून नोंदणी सुरु करण्यात आली आहेत. नोंदणीसाठी खरेदी केंद्राचा तपशील खालील प्रमाणे आहे.

1) समीर भिसे (मो. 9422922222), केंद्र चालक, प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, हिंगोली या केंद्राच्या वतीने जुने जिल्हा रुग्णालयासमोर, तोफखाना, हिंगोली येथे ,  2) महेंद्र माने (मो. 9736449383), केंद्रचालक, कयाधू शेतकरी उत्पादक कं. मर्या. तोंडापूर ता. कळमनुरी यांच्या केंद्राच्या वतीने वारंगा फाटा येथे, 3) कृष्णा हरने         (मो. 9175586758), केंद्र चालक, औंढा तालुका सह. खरेदी विक्री संघ मर्या. औंढा ना. या केंद्राच्या वतीने जवळा बाजार येथे, 4) सागर इंगोले (मो. 8390995294), केंद्र चालक, वसमत तालुका सह. खरेदी विक्री संघ मर्या. वसमत या केंद्राच्या वतीने मार्केट कमिटी वसमत येथे, 5) संदीप काकडे (मो. 7758040050), केंद्र चालक, श्री संत भगवानबाबा स्वयंरोजगार सेवा संस्था कोथळज यांच्या वतीने तोष्णीवाल कॉलेजच्या समोर साई जिनींग हिंगोली रोड सेनगाव येथे,       6) उमाशंकर माळोदे (मो. 9657260743), केंद्र चालक, विजयालक्ष्मी बेरोजगार सह. संस्था मर्या. कोळसा यांच्या वतीने साखरा ता. सेनगाव जि. हिंगोली येथे नोंदणी सुरु करण्यात आली आहे .

शेतकरी बांधवांनी आपल्या तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी संपर्क करुन नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी  खरीप  हंगाम 2021-22 मधील पिक पेरा नोंद असलेला ऑनलाईन सातबारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स सोबत आणावे. बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आय.एफ.एस.सी. कोड स्पष्ट असावा. जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये. संबंधित तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी मूग, उडीद, सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावे, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, परभणी/हिंगोली यांनी केले आहे.

******

No comments: