12 April, 2023

हिंगोली येथे नवनाथ गायकवाड यांच्या संमोहन कार्यक्रमाचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 12 :  राज्यात सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. 01 एप्रिल ते 01 मे, 2023 या कालावधीत समता पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याचाच एक भाग म्हणून नॉन स्टॉप मनोरंजनातून समाज प्रबोधन जनजागृती व्यसनमुक्तीसाठी देश विदेशात 2600 पेक्षा जास्त संमोहन कार्यक्रम करणारे सुप्रसिध्द संमोहन तज्ञ नवनाथ गायकवाड यांच्या संमोहन कार्यक्रमाचे दि. 13 एप्रिल, 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पूर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली येथे सकाळी 11.00 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

****** 

No comments: